विठ्ठलाचे पायीं , थरारली वीट राउळींची घाट , निनादली ।। ज्ञानोबाच्या दारीं , शरारे पिंपळ इंद्रायणी -जळ, खळाळलें ।। उठला हुंदका , देहूच्या वाऱ्यात तुका समाधीत , चाळवला ।। सज्जनगडात , टिटवी बोलली समाधी हालली, समर्थांची ।। एका ब्राम्हणाच्या , पैठणीपुरीत भिजे मध्यरात्र , आसवांनी ।। चालत्या गाडीत , सोडून पार्थिव निघाला वैष्णव , वैकुंठासी ।। संत - माळेतील, मणी शेवटला आज ओघळला , एकादशी ।। : ग दि मा : निवडक गदिमा : संपादन : वामन देशपांडे