मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रावण आला

हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला : कुसुमाग्रज 

नाते

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही  सगळ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला स्वरमेघ मंजुळांचा बरसे दिशात दाही गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा? मंझिलकी जयांचि तारांगणात राही : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

दोहे

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह । जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥ माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय । एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥ माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर । कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥ तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय । कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥ गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय । बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥ सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद । कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥ साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय । मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥ धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय । माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥ कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और । हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥ माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर । आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥ रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय । हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥ दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय। जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥ बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर। पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥ साधु ऐसा चाहिए ज

तो पाउस वेगळा होता...

जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता । आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता ।। ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते । ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता ।। वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते । डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता ।। पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही । ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता ।। : संगीता  जोशी