मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्तानंतर

जाणतो मी अस्तकाली  या नभाचे सत्व सारे  मावळे सूर्यासवे .  जाणतो की धूसरावर  वाहती खग सांजवेळी  ती नभाची असावे.  गर्द झाडांच्या तळाशी  सावल्या हलती , नभाच्या  भितीचे थरकाप ते .  वादळे करती जळावर  वा गुहेतून नाद भीषण  हुंदके आलाप ते.  जाणतो या मद्यरात्री  जी तमावर प्रकट होते  तारकांची संपदा.  या नभाचा या तमाचा  तो प्रकाशाशी उद्याच्या  एक दुर्दम वायदा .  : अस्तानंतर  : छंदोमयी  : कुसुमाग्रज