मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्पर्श

 स्पर्शातूनी अरण्ये उठती तुझ्या कधी ती  ज्यातून गोठलेल्या हिरव्या घनांध राती ।। कुहरात श्वापदांचे संचार हिंस्त्र तेथे  विक्राळ सावल्यांच्या हेलावती वराती ।। सगळ्याच जाणिवांना ये रूप आदिवासी  उन्मेष संस्कृतीचे सारे झडून जाती ।। काळोख जीवनाच्या गर्भाशयात साठे  मातीत मांसलाच्या जिरतात सर्व नाती ।। स्पर्शात त्याच केव्हा फुलती सरोवरे ही  तारांगणे पुनेची ज्याच्या जळात न्हाती ।। लहरी निळ्या हजारो करुणार्त सांत्वनाच्या  अस्वस्थ हा किनारा आपुल्या कुशीत घेती ।। : स्पर्श  : छंदोमयी  : कुसुमाग्रज