मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ना सांगताच तू

ना सांगताच तू  मला उमगते सारे  कळतात तुलाही  मौनातील इशारे  दोघांत का मग ? शब्दांचे बांध  'कळण्या'चा चाले  'कळण्या'शी संवाद  : सुधीर मोघे 

ओलेता गंधीत वारा

ओलेता गंधीत वारा  आला घेऊन सांगावा  पाझरला आतुर मेघ  त्या दूर अनामिक गावा मन चातक व्याकुळ वेडा इतुकेच म्हणे हरखून  येईल मेघ माझाही  जाईल मला भिजवुन व्याकुळ अशी नक्षत्रे  कोरडीच केवळ जाती  भिजण्याच्या आशेवरती  कोमेजुन गेल्या राती मिटल्यावर डोळे अजुनी  ऐकते सरींचे साद  त्या तेव्हाच्या भिजण्याचे  अंतरी अजुन पडसाद   -  गुरु ठाकूर

क्षणभर विश्रांती

क्षणभर विश्रांती या जगण्यासाठी क्षणभर विश्रांती मोहरण्यासाठी विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी क्षणभर विश्रांती ... दूरची वाट अन स्वप्नातली दूर गावे जायचे नेमके कोठे कुणाला न ठावे थांबती ,  संपती जुळती नव्या रोज वाटा सूर त्यांच्यासवे या जीवनाचे जुळावे विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी क्षणभर विश्रांती ... आवरावे जरा बेभानल्या पावलांना सावरावे जरा स्वप्नाळल्या लोचनांना गीत ओठी नवे घेवूनी या जीवनाचे गुंतवावे जरा भांबावलेल्या मनाला विरलेल्या नात्यांना विझलेल्या आशांना चुकलेल्या वाटानाही समजावून घेण्यासाठी क्षणभर विश्रांती ..

अब तो यह भी नहीं रहा अहसास

अब तो यह भी नहीं रहा अहसास दर्द होता है या नहीं होता इश्क़ जब तक न कर चुके रुस्वा आदमी काम का नहीं होता हाय क्या हो गया तबीयत को ग़म भी राहत-फ़ज़ा  नहीं होता वो हमारे क़रीब होते हैं जब हमारा पता नहीं होता दिल को क्या-क्या सुकून होता है जब कोई आसरा नहीं होता

मिली हवाओंमे उडनेकी सजा यांरो

मिली हवाओंमे उडनेकी   सजा यांरो    के जमिके रीश्तोंसे कट गया हुं यार 

रात्रच कि स्तब्ध उभी

रात्रच की स्तब्ध उभी क्षितिजाच्या काठावर खिळलेले पाऊल अन् गिळलेले लाख स्वर आवरला तोल कसा ठाऊक हे एक तिला सावरला बोल कसा ठाऊक हे एक तिला गिळलेल्या बोलाची खिळलेल्या तोलाची शपथ तिच्या ओठावर चढत जिचा रंग मला : रात्रच कि स्तब्ध उभी : मेंदी : इंदिरा संत