मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोन्ही बाजुंनी दऱ्या

दोन्ही बाजुंनी दऱ्या, धर झुडुप हाती सोडु नको रे धीर, येवो संकट किती येउ दे परचीती, काय तुझ्या ललाटी वाट्च्या वाटसरा वाट बिकट मोठी : बहिणाबाई

लवले होते फ़ुलुनी ताटवे नव्या वसंतात

लवले होते फ़ुलुनी ताटवे नव्या वसंतात चंद्र बिलरी शिंपित होता रजताने रात बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत आशा पक्षांपरी उडाल्या होत्या गगनात तोच अचानक फ़ुले कोठोनि पड्ली ओंजळ्भर आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर कलेकलेने चंद्रापरी ते प्रेमहि मावळ्ले शिड फ़िरवुनी तारु आपले माघारी वळ्ले आज पुन्हा त्या जागी येता तुट्लेले धागे ताट्व्यात या दिसती अजुनि हो अंतर जागे आज नसे ती व्याकुळ्ता ,ना राग ना अनुराग विझुनि गेलि कधिच जी तु फ़ुलवलीस आग मात्र कुतुहल केवळ वळ्तांना पाउले किती जणांवर उधळलीस वा उधळ्शील तु फ़ुले : कुसुमाग्रज

चंद्र अर्धा राहिला

चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहीली भेट अर्धी, गीत अर्धे, प्रित अर्धी रहिली मोकळे बोलु कसे मी, शब्द पाठी थांबले लाजऱ्या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे देखीले ओठ अर्धे विलगले, अर्ध उमलली पाकळी चंद्र अर्धा.............. बिलगुनी रमल्या तरुंशी, पेंगलेल्या सावल्या तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या धुंद झाल्या दशदिशा, रात्र ही उल्हासली चंद्र अर्धा............ वाकले आकाश खाली, दुर त्या क्षीतिजावरी चांद्णे धुंडित वारा पोहला वेलीवरी भेट झाल्या श्रुश्टि हि, अर्ध झुकली रात्र ही चंद्र अर्धा.......... :सुरेश भट

कागज की कश्ती थी ...

कागज की कश्ती थी ... पानी का किनारा था ... खेलने की मस्ती थी ... दिल ये आवारा था ... कहा आ गए... इस समजदारी के जंगल में ... वो नादान बचपन... कितना प्यारा था ...

कोई ये कैसे बताए

कोई ये कैसे बताए , को वो तनहा क्यों है वो जो अपना था, वही और किसीका क्यों है यही दुनीया है तो फ़िर, ऐसी ये दुनीया क्यों है यही होता है तो, आखिर यही होता क्यों है इक जरा हाथ बढा दे तो, पकड ले दामन उसके सीने मे समा जाए, हमारी धडकन इतनी कुर्बत है तो फ़िर, फ़ासला इतना क्यों है? दिल-ए-बरबाद से निकला नही अबतक कोई इक लुटे घर पे दिया करता है दस्तक कोई आस जो टूट गयी हैं, फ़िर से बंधाता क्यों है? तुम मसर्रत का कहो या इसे गम का रिश्ता कहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता है जनम का जो ये रिश्ता तो बदलता क्यों है?

शब्द

शब्द मोत्यांसारखे असतात... म्हणून कसेही माळायचे नसतात.... शब्दांच्या ओळी होतांना... शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

विकायला आज

विकायला आज निघालो मी व्यथा जुनी माझी कथा कोण घेई ? तुझ्या बाजाराचे वेग़लेच भाव कसे माझे घाव खपतील ? हाडांच्या रे भिंती मातीच्या या घरा दु:खाचा हा भार कोण घेई ? कोण घेई माझ्या ओसाडाचा भोग त्याच्या घरा आग लागायची . म्हणूनच माझी दु:खावर माया वेगलीच काया हवी मला. :ग्रेस

तू असतीस तर

तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातून एक दिवाणे नवथर गाणे बकुळीच्या फुलापरी नाजुक फुलले असते गंधाने क्षण आणि रंगांनी केले असते क्षितीजावरील खिन्न रितेपण पसरली असती छायांनी चरणतली मृगशामल मखमल आणि शुक्रांनी केले असते स्वागत अपुले हसून मिश्किल तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे जग सुंदर चांदण्यात विरघळले असते गगन धरेतील धुसर अंतर :मंगेश पाडगावकर

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायाचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे बेसावधास कैसे डसणार हे निखारे? :विंदा करंदीकर

तेच ते ! तेच ते !!

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते खानावळीही बदलून पाहील्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकू पासून ताजमहाल, सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार सुख थोडे दु:ख फार संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे त्या स्वप्नाचे शिल्पकार, कवि थोडे कवडे फार पडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध नऊ धगे एक रंग, व्यभिचाराचे सारे ढंग पुन्हा पुन्हा तेच भोग आसक्तीचा तोच रोग तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती ' तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती ' तेच ओठ तेच डोळे तेच मुरके तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एकतारी करीन म्हटले आत्महत्त्या रोमिओची आत्महत्त्या दधीचिची आत्महत्त्या आत्महत्त्याही तीच ती आत्मा ही तोच तो हत्त्याही तीच ती कारण, जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते : विंदा करंदीकर

माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे ! अन्नाशिवाय, कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको, डोळे शिव ! नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भास छातीमधे अडेल श्वास, विसर यांना दाब कढ माझ्या मना बन दगड ! हा रस्ता अटळ आहे ! ऐकू नको हा आक्रोश तुझ्या गळ्याला पडेल शोष कानांवरती हात धर त्यांतूनही येतील स्वर म्हणून म्हणतो ओत शिसे संभाळ, संभाळ, लागेल पिसे ! रडणा-या रडशील किती ? झुरणा-या झुरशील किती ? पिचणा-या पिचशील किती ? ऐकू नको असला टाहो माझ्या मना दगड हो ! हा रस्ता अटळ आहे ! येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळोखात; हसतात विचकून काळे दात आणि म्हणतात, कर हिंमत आत्मा विक उचल किंमत ! माणूस मिथ्या, सोने सत्य स्मरा त्याला स्मरा नित्य ! भिशील ऐकून असले वेद बन दगड नको खेद ! बन दगड आजपासून काय अडेल तुझ्यावाचून गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी ? काय तुझे हे निःश्वास मरणा-याला देतील श्वास ? आणिक दुःख छातीफोडे देईल त्यांना सुख थोडे ? आहे तेवढे दुःखच फार माझ्या मना कर विचार कर विचार हास रगड माझ्या मना बन दगड हा रस्ता अटळ आहे ! अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी ए

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण  आल्या पावसाच्या सरी;  किती चातकचोचीने  प्यावा वर्षा‌ऋतू तरी!  काळ्या ढेकळांच्या गेला  गंध भरून कळ्यांत;  काळ्या डांबरी रस्त्याचा  झाला निर्मळ निवांत.   चाळीचाळीतून चिंब  ओंली चिरगुटें झाली;  ओल्या कौलारकौलारीं  मेघ हुंगतात लाली.  ओल्या पानांतल्या रेषा  वाचतात ओले पक्षी;  आणि पोपटी रंगाची  रान दाखवितें नक्षी.  ओशाळला येथे यम,  वीज ओशाळली थोडी,  धावणाऱ्या क्षणालाही  आली ओलसर गोडी.   मनी तापलेल्या तारा  जरा निवतात संथ;  येतां आषाढ-श्रावण  निवतात दिशा-पंथ.  आला आषाढ-श्रावण  आल्या पावसाच्या सरी;  किती चातकचोचीने  प्यावा वर्षा‌ऋतू तरी!   : बा.सी.मर्ढेकर

माय

माय म्हनता म्हनता, ओठ ओठालागी भिडे, आत्या म्हनता म्हनता, केव्हडं अंतर पडे , ताता म्हनता म्हनता, दातामधी जीभ अडे , जीजी म्हनता म्हनता, झाला जिभेला निवारा , सासू म्हनता म्हनता, गेला तोंडातून वारा : बहिणाबाई चौधरी.

पेरनी पेरनी

पेरनी पेरनी आले पावसाचे वारे बोलला पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे! पेरनी पेरनी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड! पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे. बोलेना पोपया पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे! पेरनी पेरनी अवघ्या जगाच्या कारनी. ढोराच्या चारनी, कोटी पोटाची भरनी. : बहिणाबाई चौधरी.

माझी मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्साच लेकरू चान्गदेव योगियान तिले मानला रे गुरू देख ग्यानियाच्या राजा, आदिमाया पान्हावली सर्व्याआधी रे मुक्ताई पान्हा पियीसनी गेली.. अरे सन्याशाची पोर कोन बोलती हिनई टाकीदेयेल पोरान्च कधी तोन्ड पाहू नही.. अरे अस माझ तोन्ड कस दावू मी लोकाले? ताटी लावी ग्यानदेव घरामधी रे दडले ! उबगले ग्यानदेव घडे असन्गाशी सन्ग, कयवयली मुक्ताई बोले ताटीचे अभन्ग.. घेता हिरीदाचा ठाव ऐका ताटीचे अभन्ग एका एका अभन्गात उभा केला पान्डुरन्ग.. गह्यरले ग्यानदेव डोये गेले भरीसन असा भाग्यवन्त भाऊ, त्याची मुक्ताई बहीन... : बहिणाबाई चौधरी.

बहिणाबाई

दया नही मया नही, डोयाले पानी गोगलगायच्या दुधाचं काढा वो लोनी केसावार रुसली फनी एकदा तरी घाला माझी येनी कर्‍याले गेली नवस आज निघाली आवस आग्या टाकीसनी चुल्हा पेटत नही टाया पिटीसनी देव भेटत नही पोटामधी घान, होटाले मलई मिय्याच्या तांब्याले भाइरून कल्हई तवा खातो भाकर, चुल्हा भुकेला पव्हारा पेतो पानी, राहाट तान्हेला मानसानं घडला पैसा पैशासाठी जीव झाला कोयसा मानूस मोठा हिकमती, याचं घोंगडं त्याच्यावर दगडाचा केला देव शेंदूराच्या जीवावर डोयाले आली लाली चस्म्याले औसदी लावली वडगन्याले ठान नही घरकोंबड्याले ग्यान, नही घरजवायाले मान नही म्हननारानं म्हन केली जाननाराले अक्कल आली : बहिणाबाई चौधरी.

ओव्या

जसा बोल्यले कर्रय तसा कामाले करारी सभावानं मन मोका असोद्याचा शेतकरी कारामधी रोखठोक नही उसनउधारी दोन देये दोन घेये असा राजा शेतकरी असा राजा शेतकरी चालला रे आढवनी देखा त्याच्या पायाखाले काटे गेले वाकसनी *************** बोरू चाले कुरुकुरु तश्या पाट्या पेनाशिली पोर्‍हं निंघाले शिक्याले कधीमधी टांगटोली हाया समोरची शाया पोर्‍हं शायीतून आले हुंदडत हायाकडे ढोरं पान्यावर गेले अरे असोद्याची शाया पोर्‍हं शंबर शंबर शायामधी भारी शाया तिचा पह्यला नंबर इमानानं शिकाळती तठी 'आबा' मायबाप देती अवघ्याले इद्या भरीभरीसनी माप : बहिणाबाई चौधरी.

माझ्या जीवा...

जीव देवानं धाडला जल्म म्हने " आला आला " जव्हा आलं बोलावनं मौत म्हने " गेला गेला " दीस आला कामामधी रात नीजमधी गेली मरनाची नीज जाता जलमाची जाग आली. नही सरलं सरलं जीवा तुझं येनं जानं जसा घडला मुक्काम त्याले म्हनती रे जीनं. आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर. येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप काम करता करता देख देवाजीचं रूप. ऐक ऐक माझ्या जीवा पीडायेलाचं कन्हनं ? दे रे गांजल्याले हात त्याचं ऐक रे म्हननं. अरे निमानतोंड्याच्या वढ पाठीवरे धांडा नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झालझेंडा ! हास हास माझ्या जीवा असा संसारात हास इडा पीडा संकटाच्या तोंडावर्‍हे कायं फ़ास जग जग माझ्या जीवा असं जगनं तोलाचं उच्च गगनासारखं धरत्रीच्या रे मोलाचं ! : बहिणाबाई चौधरी.

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी नशीबी दगड गोटे काट्या कुट्याचा धनी पायाले लागे ठेचा आलं डोयाले पानी वरून तापे उन आंग झालं रे लाही चालला आढवानी फ़ोड आले रे पायी जानच पडीन रे तुले लोकाच्यासाठी वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी ! दिवस ढयला रे पाय उचल झट असो नसो रे तठी तुझ्या लाभाची गोट उतार चढनीच्या दोन्हि सुखादुखात रमव तुझा जीव धीर धर मनात उघडू नको आता तुझ्या झाकल्या मुठी वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी ! ' माझेज भाऊबंद घाईसनी येतीन !' नको धरू रे आशा धर एव्हढं ध्यान तुझ्या पायाने जानं तुझा तुलेच जीव लावनी पार आता तुझी तुलेच नाव मतलबाचे धनी सर्वी माया रे खोटी वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी ! वार्‍याचं वाहादन आलं आलं रे मोठं त्याच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट दोन्ही बाजूनं दर्‍या धर झुडूप हाती सोडू नको रे धीर येवो संकट किती येऊ दे परचिती काय तुझ्या ललाटी वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी : बहिणाबाई चौधरी.

माझी माय सरसोती

माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपितं पेरली! माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत पावसात सामावतं माटीमधी उगवतं.. अरे देवाच दर्सन झालं झालं आपसुक हिरिदात सुर्यबापा दाये अरूपाच रूप.. तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामंधी देवा तुझं येन-जान वारा सांगे कानामंधी फुलामधि सामावला धरत्रीचा परमय माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय? किती रंगवशी रंग रंग भरले डोयात माझ्यासाठी शिरीरंग रंग खेये आभायात..! धर्ती मधल्या रसानं जीभ माझी सवादते तव्हा तोंडातली चव पिंडामधी ठाव घेते..! :बहिणाबाई चौधरीं

कशाले काय म्हनू नही..

बिना कपाशिन उले त्याले बोंड म्हनू नही हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हनू नही नही वारयान हलल त्याले पान म्हनू नही नही एके हरिनाम त्याले कान म्हनू नही पाटा येहेरीवाचून त्याले मया म्हनू नही नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही.. निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही ज्याच्या मधि नाही पानी त्याले हाय म्हनू नही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही येहेरीतून ये रीती तिले मोट म्हनू नही केली सोताची भरती त्याले पोट म्हनू नही नही वळखला कान्हा तिले गाय म्हनू नही जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही अरे, वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही इके पोटच्या पोरीले, त्याले बाप म्हनू नही दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही जल्मदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही... ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ति म्हनू नही ज्याच्यामधी नही चेव त्याले शक्ति म्हनू नही! :बहिणाबाई चौधरीं

हिरिताच देन घेन

नको लागू जीव, सदा मतलबापाठी, हिरीताच देन घेन नाही पोटासाठी उभे शेतामधी पिक ऊन वारा खात खात तरसती केव्हा जाउ, देवा, भुकेल्या पोटात, पेटवा रे चुल्हा आता, मान्डा ताटवाटी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी पाहीसनी रे लोकाचे, यवहार खोटे नाटे तव्हा बोरी बाभयीच्या आले आन्गावर काटे राखोयीच्यासठी झाल्या शेताले कपाटी, नको लागू जीवा सदा मतलबापाठी किती भरला कनगा भरल्यान होतो रिता हिरिताच देन घेन नही डडोरा करता गेली देही निन्धीसनी नाव रे शेवटी नको लागु जीवा सदा मतलबापाठी :बहिणाबाई चौधरीं

प्रवासी पक्षी

अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती नक्षी. माझे आकाश माझा अंधार यांचे अपार भेदत आहेत. जिवनाची हलती जाग अजीवावर खोदत आहेत. निशब्दावर वल्हवणा~या सफेद नौका सफेद शिडे . मिच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे . एकले आहे प्रवास करतात दिवस रात्र हजार मैल डोंगरद~या नद्या सागर शहरे जंगल यांच्या पैल आले आहेत अदृश्यातुन जाणार आहेत अदृशात अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीतावाचून संधीवाचून अथंगातील गती उरली छातीत उगाच गहीवर भरला उगीच पापणी भिजुन गेली : प्रवासी पक्षी  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

दिवा...

घन अंधारी निबिड वनातुन पथिका दिसतो....दुर दिवा तसा मला तव नेत्रांमधला कोमल अश्रु...आज हवा !!! : कुसुमाग्रज

परवाच्या पावसात

परवाच्या पावसात झोपडपट्टीतील एक मूल वाहून गेले बुडून मेले बूडाले तर बुडू द्या मूल बुडाले म्हणजे काही सात तारयाचे ताजमहाल किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम बुडाले नाही आणि झोपडपट्टीतील त्या उघड्या नागड्या मूलाचे असे मूल्य तरी किती? साधे गणित येत असेल तर करता ये ईल हिशेब उत्तर अर्थात पैशातच हे मत तुमचे माझेच अहे असे नव्हे त्याच्या आईचेही तेच असावे कारन मूलाचे कलेवर मांडीवर घेऊन ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा वस्तीवर एक वार्ता येऊन कोसळली यावेळी मात्र करुणामय मेघासारखी वार्ता: नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी कुजलेल्या धान्याची पोती ओतीत सुटला आहे उकिरड्यावर बाईने आपला हंबरडा आवरला घशात अर्ध्यावरच अन मांडीवरचे कलेवर खाली टाकून घरातल्या उरल्या सुरल्या पिशव्या गोळा करुन ती बेफाम धावत सुटली उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी :कुसुमाग्रज

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला तिच्या कौलारी बसुनि पारवा तो खिन्न नीरस एकांतगीत गातो सूर्य मध्यान्ही उभा राहे घार मंडळ त्याभवती घालताहे पक्षी पानांच्या शांत सावल्यांत सुखे साखरझोपेत पेंगतात. तुला नाही परि हौस उडायाची गोड हिरव्या झुबक्यात दडायाची उष्ण झळ्या बाहेर तापतात गीतनिद्रा तव आंत अखंडित चित्त किंवा तव कोवळ्या विखारे दुखतेखुपते का सांग सांग बा रे तुला काही जगतात नको मान गोड गावे मग भान हे कुठून झोप सौख्यानंदात मानवाची पुरी क्षणही कोठून टिकायाची दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज करूणगीते घुमवीत जगी आज. दुःखनिद्रा ती आज तुला लागे तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे फिरे माझ्या जगतात उष्ण वारे तुला त्याचे भानही नसे बा रे. : बालकवी

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे भेटले असतील, नसतील. चुकून-चुकून कधींतरी चार शब्द दिले घेतले असतील, नसतील ... शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे- असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन स्थिर करणारें एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प ... त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची. त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची. : इंदिरा संत

आई

कळ्या माझ्या आनंदाच्या साठवील्या माझ्याकडे, फुलवाया तुझ्यापुढे. आसवे मी साठवली पापणीच्या काठोकाठ, तुझ्यापाशी देण्या वाट. ठरवले मनापाशी, बोलावयाचे कितितरी, निजुनिया मांडीवरी. किती लांब वाटे काळ, आई कधी भेटशील? जीव झाला उतवीळ. : इंदिरा संत

शिकारा

संथ झुलता डोलता होतो मांडीचा शिकारा निळ्याहिरव्या पाण्यात शिखरांचा तृप्त पारा एक पाय पाण्यामध्ये एक पाय आईच्या दंडाशी पहुडला बाळजीव अलमशहाची मिराशी एक लबाडशी मुठ घेते माऊलीचे सुख दुज्या मुठीत हिंदोळे सोनमाळेचे कौतुक हात फिरतो आईचा पालवते अंग अंग लुब्धावती दोन्ही डोळे ओठी अमृताचा कुंभ झिरीझिरी पदरात उभा स्वप्नांचा पिसारा आणि शिकाराला वाटे आता नकोच किनारा : इंदिरा संत (रंगबावरी)

हेही करु तेही करु

हसतील ना कुसूमे जरी ना जरी म्हनतील 'ये' पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमूची नव्हे भ्रमरा परी सौन्दर्य वेडे आहो जरी ऐसे अम्ही इश्कातही नाही हुठे भिक्शुकी केली अम्ही खेळलो इश्कात आम्ही बेधून्द् आम्ही खेळलो लोळलो मस्तीत नाही पायी कूनाच्या लोळलो अस्मिता इश्कात सा-या केव्हान्च नाही विसरलो आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मो़क्ष आहे साधला बर्बादिची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली इश्कही बर्बाद करण्या माघार नाही घेतली ना रडू नुसतेच आम्ही हाय ना नुसते करु आहो शिवाचे भक्त आम्ही हेही करु तेही करु :भाऊसाहेब पाटणकर

सांगशी निष्काम कर्मा

सांगशी निष्काम कर्मा, कृष्णा अरे वेदांत तू समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे? भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या धावूनी सार्‍या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू? मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे :भाऊसाहेब पाटणकर

सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे

सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे तो कविंचा मान, तितुकी पायरी मझी नव्हे |१| आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सम्मानितो सम्मानितो हासू, तसे या आसवा सम्मानितो |२| जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे |३| मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे|४| आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे|५| :भाऊसाहेब पाटणकर

खेळलो इष्कात सार्‍या, बेधुंद आम्ही खेळलो.

खेळलो इष्कात सार्‍या, बेधुंद आम्ही खेळलो. लोळलो मस्तीत, नाही पायी कुणच्या लोळलो. अस्मिता इष्कात सार्‍या, केव्हाच नाही विसरलो. आली तशीही वेळ तेव्हा, इष्क सारा विसरलो. :भाऊसाहेब पाटणकर

रोखिले नयनात आसु

रोखिले नयनात आसु, मि शब्द ओठि रोखीले बघीतले नाहि तिला, मि नजरेस माझ्या रोखीले सांगुच का या संयमाला, मि का असा सोसला होति अम्हा जणीव, अम्हा इन्कार नसता सोसला :भाऊसाहेब पाटणकर

हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है?

हर एक बात पे कहते हो तुम कि तू क्या है? तुम ही कहो कि ये अंदाज़-ए-ग़ुफ़्तगू क्या है? रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ायल जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है? जो आँख ही से न टपके तो फिर लहू क्या है? चिपक रहा है बदन पर लहू से पैराहन हमारी जेब को अब हाजत-ए-रफ़ू क्या है? जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगा, कुरेदते हो जो अब राख जुस्तजू क्या है? रही ना ताक़त-ए-गुफ़्तार और हो भी तो किस उम्मीद पे कहिए कि आरज़ू क्या है? : ग़ालिब

दिल-ए नादां तुझे हुआ क्‌या है

दिल-ए नादां तुझे हुआ क्‌या है अख़िर इस दर्‌द की दवा क्‌या है हम हैं मुश्‌ताक़ और वह बेज़ार या इलाही यह माज्‌रा क्‌या है मैं भी मुंह में ज़बान रख्‌ता हूं काश पूछो कि मुद्‌द`आ क्‌या है जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद फिर यह हन्‌गामह अय ख़ुदा क्‌या है यह परी-चह्‌रह लोग कैसे हैं ग़म्‌ज़ह-ओ-`इश्‌वह-ओ-अदा क्‌या है शिकन-ए ज़ुल्‌फ़-ए अन्‌बरीं क्‌यूं है निगह-ए चश्‌म-ए सुर्‌मह-सा क्‌या है सब्‌ज़ह-ओ-गुल कहां से आए हैं अब्‌र क्‌या चीज़ है हवा क्‌या है हम को उन से वफ़ा की है उम्‌मीद जो नहीं जान्‌ते वफ़ा क्‌या है हां भला कर तिरा भला होगा और दर्‌वेश की सदा क्‌या है जान तुम पर निसार कर्‌ता हूं मैं नहीं जान्‌ता दु`आ क्‌या है मैं ने माना कि कुछ नहीं ग़ालिब मुफ़्‌त हाथ आए तो बुरा क्‌या है : ग़ालिब

दिया है दिल अगर उस को

दिया है दिल अगर उस को, बशर है क्या कहिये हुआ रक़ीब तो हो, नामाबर है, क्या कहिये ये ज़िद्, कि आज न आवे और आये बिन न रहे क़ज़ा से शिकवा हमें किस क़दर है, क्या कहिये रहे है यूँ गह-ओ-बेगह के कू-ए-दोस्त को अब अगर न कहिये कि दुश्मन का घर है, क्या कहिये ज़िह-ए-करिश्म के यूँ दे रखा है हमको फ़रेब कि बिन कहे ही उंहें सब ख़बर है, क्या कहिये समझ के करते हैं बाज़ार में वो पुर्सिश-ए-हाल कि ये कहे कि सर-ए-रहगुज़र है, क्या कहिये तुम्हें नहीं है सर-ए-रिश्ता-ए-वफ़ा का ख़्याल हमारे हाथ में कुछ है, मगर है क्या कहिये उंहें सवाल पे ज़ओम-ए-जुनूँ है, क्यूँ लड़िये हमें जवाब से क़तअ-ए-नज़र है, क्या कहिये हसद सज़ा-ए-कमाल-ए-सुख़न है, क्या कीजे सितम, बहा-ए-मतअ-ए-हुनर है, क्या कहिये कहा है किसने कि "ग़ालिब" बुरा नहीं लेकिन सिवाय इसके कि आशुफ़्तासर है क्या कहिये : ग़ालिब

न हुई गर मेरे मरने से तसल्ली न सही

न हुई गर मेरे मरने से तसल्ली न सही इम्तिहाँ और भी बाक़ी हो तो ये भी न सही ख़ार-ख़ार-ए-अलम-ए-हसरत-ए-दीदार तो है शौक़ गुलचीन-ए-गुलिस्तान-ए-तसल्ली न सही मय परस्ताँ ख़ूम-ए-मय मूंह से लगाये ही बने एक दिन गर न हुआ बज़्म में साक़ी न सही नफ़ज़-ए-क़ैस के है चश्म-ओ-चराग़-ए-सहरा गर नहीं शम-ए-सियहख़ाना-ए-लैला न सही एक हंगामे पे मौकूफ़ है घर की रौनक नोह-ए-ग़म ही सही, नग़्मा-ए-शादी न सही न सिताइश की तमन्ना न सिले की परवाह् गर नहीं है मेरे अशार में माने न सही इशरत-ए-सोहबत-ए-ख़ुबाँ ही ग़नीमत समझो न हुई "ग़ालिब" अगर उम्र-ए-तबीई न सही : ग़ालिब

नुक्‌तह-चीं है ग़म-ए दिल

नुक्‌तह-चीं है ग़म-ए दिल उस को सुनाए न बने क्‌या बने बात जहां बात बनाए न बने मैं बुलाता तो हूं उस को मगर अय जज़्‌बह-ए दिल उस पह बन जाए कुछ ऐसी कि बिन आए न बने खेल सम्‌झा है कहीं छोड़ न दे भूल न जाए काश यूं भी हो कि बिन मेरे सताए न बने ग़ैर फिर्‌ता है लिये यूं तिरे ख़त को कि अगर कोई पूछे कि यह क्‌या है तो छुपाए न बने इस नज़ाकत का बुरा हो वह भले हैं तो क्‌या हाथ आवें तो उंहें हाथ लगाए न बने कह सके कौन कि यह जल्‌वह-गरी किस की है पर्‌दह छोड़ा है वह उस ने कि उठाए न बने मौत की राह न देखूं कि बिन आए न रहे तुम को चाहूं कि न आओ तो बुलाए न बने बोझ वह सर से गिरा है कि उठाए न उठे काम वह आन पड़ा है कि बनाए न बने `इश्‌क़ पर ज़ोर नहीं है यह वह आतिश ग़ालिब कि लगाए न लगे और बुझाए न बने : ग़ालिब

मंदिरे सुनी सुनी

मंदिरे सुनी सुनी मंदिरे सुनी सुनी कुठे न दीप काजवा मेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा रात्र सुर पेरुनी अशी हळू हळू भरे समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे गळ्यात शब्द गोठले अशांतता दिसे घनी दु:ख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी? एकदाच व्याकुळा प्रतिध्वनित हाक दे देह कोसळून हा नदीत मुक्त वाहु दे..

मरण

अलभ्य फुलला सखे घनवसंत हा मोगरा विनम्र लपवू कुठे ह्र्दयस्पंदनाचा झरा उन्हात मन शिंपिले पळसपेटला पारवा कुडीत जळतो जसा मरणचंदणाचा दिवा कुशीत जड अस्थिला नितळ पालवीची स्पृहा भयाण मज वाटतो रुधिर अस्त गांधार हा उदास भयस्वप्न की समिर येथला कोवळा गळ्यात मग माझिया सहज घातला तू गळा सुगंध दडवू कुठे गगन वैरिणीचे वरी तुडुंब भरले तुवा कलश अमृताचे घरी जळात जरी नागवी सलग इंद्रियांची दिठी विभक्त जणु कुंतिला शरण कर्ण ये शेवटी : ग्रेस

चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते थंडाव्याची कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापॆ सुखांसवे होऊनी अनावर तारांमधला पतंग कोठे भुलूनी गेला गगनमंडला फ़णा डोलवित झोंबू पाहॆ अस्तरवीच्या कवचकुंडला उंचवट्यावर म्हशी गोठल्या तसेच कोठे कातळ काळे वर्ख तृप्तिचा पानोपानी बघून झाले ओलेओले कुठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे एक त्यातले लुचे आईला सटीनकांति गोरे गोरे फूललपंखरी फूलथव्यांवर कुठे सांडली कुंकुमटीम्बे आरसपानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे कुठे आवळीवरी कावळा मावळतिचा शकून सांगे पूर्वेला राउळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे घाटामध्ये शिरली गाडी अन रात्रीचा पडला पडदा पण चित्रांची विचित्रवीण अजूनी करते दिडदा दिडदा :बा. भ. बोरकर

देखणे ते चेहरे

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा बा. भ. बोरकर....

डोळे

डोळे भलतेच बोलके  शब्दांआधी बोलू येती  तिचे मोरणीचे मन  अंग आषाढभरती   काही बोलू नये  तिशी  नुस्ते डोळ्यांशी बुडावे  आणि बेसावधपणी  उभे आभाळ झेलावे!  - ना.धो.महानोर

वीज

आकाशाकडे पाहावं म्हणजे ते जवळचं वाटत. "विराट" ह्या शब्दाचा अर्थ तेव्हा समजतो.'अमर्याद' शब्द परखायाचा असेल तर समुद्र पाहावा. 'विविधता' शब्द समजून घ्यायचा असेल तर माणूस पाहावा. पण तोही कसा ..... तर आतून आतून पाहावा. मग माणसांची भीती उरत नाही. मग अगदी हलकटातला हलकट माणूस देखील मला तो 'हलकट' म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं आणि सगळ निर्भय होत. उपमा द्यायची झाली तर, मी विजेचीच उपमा देईन. पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली कि, ती आकाशाचा त्याग करते. पृथ्वीवर दगड होऊन पडते, पण पडण्यापासून स्वतःला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम करताना माणसानेहि असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालेल, पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण 'नाद' विसरणार नाही. पाय थकले तरी बेहत्तर, पण 'गती'ची ओढ टिकवून धरीन..... हि भूक कायम असली कि झालं. : व . पु.

प्रेमाचा खरा अर्थ

प्रेमाचा खरा अर्थ...... दूरवरच्या माळावर मला एक वड दिसला होता माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला मी त्याला विचारलं टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात तर म्हनाला मी तर पडलोय प्रेमात तुझं मला काय माहीत? मी पुन्हा विचारलं प्रेम म्हनजे काय असतं तर म्हनाला प्रेम हे जगन्याचं भान असतं पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं अलगद झोळीत पडलेलं दान असतं मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस तर म्हणाला मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय जिने मला गेल्या पावसात भिजवलं मी त्याला म्हणालो अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात ती तर सगळ्यानांच भिजवते पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं अरे मग तर तू मुर्खच अरे तू स्वताकडे पाहिलयस का? अर्धा तर जमिनीत रुतलेला उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस तर तो नुसताच गूढ़् हसला इत्क्यात अंधारुन आले आकाशात मेघच मेघ जमा झाले तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती त्याच्याशी खेळत होती या वडाबद्द्ल तर तीला काहीच

काही खुळ्या कळ्यांचा फुलण्यात वेळ गेला

काही खुळ्या कळ्यांचा फुलण्यात वेळ गेला त्यांनाच कंटकांचा छळण्यात वेळ गेला तुमच्या कधीच गेली हातामध्ये शिकार अमुचा मधाळ स्वप्ने बघण्यात वेळ गेला केला तिने इषारा सांगून सर्व झाले अमुचाच अक्षरांच्या शोधात वेळ गेला गेले खुशालचेंडू चढुनी जिने भरारा कंगाल शौकिनांचा रस्त्यात वेळ गेला इकडे रडे असा हा तिकडे कुढे तशी ती बहुतेक प्रेमिकांचा झुरण्यात वेळ गेला जगुनिही जिंदगीचे कळले न सार कही मोक्षास वाहिलेल्या चर्चेत वेळ गेला - यशवंत देव

आशना

किया है प्यार जिसे हमने ज़िन्दगी की तरह वो आशना भी मिला हमसे अजनबी की तरह किसे ख़बर थी बढ़ेगी कुछ और तारीकी छुपेगा वो किसी बदली में चाँदनी की तरह बढ़ा के प्यास मेरी उस ने हाथ छोड़ दिया वो कर रहा था मुरव्वत भी दिल्लगी की तरह सितम तो ये है कि वो भी ना बन सका अपना कूबूल हमने किये जिसके गम खुशी कि तरह कभी न सोचा था हमने "क़तील" उस के लिये करेगा हमपे सितम वो भी हर किसी की तरह : क़तिल शिफ़ाई

बात निकलेगी तो

बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे ये भी पूछेंगे की तुम इतनी परेशां क्यों हो उंगलियाँ उठेंगी सूखे हुए बालो की तरफ इक नज़र देखेंगे गुजरे हुए सालो की तरफ चूडियों पर भी कई तंज़ किये जायेंगे कांपते हाथो पे भी फिकरे कसे जायेंगे लोग जालिम हैं हर इक बात का ताना देंगे बातों बातों मे मेरा ज़िक्र भी ले आयेंगे उनकी बातों का ज़रा सा भी असर मत लेना वरना चेहरे के तासुर से समझ जायेंगे चाहे कुछ भी हो सवालात ना करना उनसे मेरे बारे मे कोई बात ना करना उनसे बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी.....

हज़ारों ख्वाहिशें ऐसी

हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । निकलना खुल्द से आदम का सुनते आये हैं लेकिन, बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले । मुहब्बत में नही है फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले । ख़ुदा के वास्ते पर्दा ना काबे से उठा ज़ालिम, कहीं ऐसा ना हो यां भी वही काफिर सनम निकले । क़हाँ मैखाने का दरवाज़ा 'ग़ालिब' और कहाँ वाइज़, पर इतना जानते हैं कल वो जाता था के हम निकले।

दिखाई दिए

दिखाई दिए यूँ के बेखुद किया हमे आपसे भी जुदा कर चले जबी सजदा करते ही करते गए हक ऐ बंदगी हम अदा कर चले परस्तिश की या तक की ये बुत तुझे नज़र में सबों की खुदा कर चले बहोत आरजू थी गली की तेरे सो या से लहू में नहाकर चले दिखाई दिए यूँ के बेखुद किया हमे आपसे भी जुदा कर चले : मीर

शाम से

शाम से आँख में नमी सी है ....  आज फिर आपकी कमी सी है ||  दफन करदो हमें के सांस मिले  नब्ज कुछ देरसे थमी सी है ||  वक़्त रहता नहीं कही टिककर ....  इसकी आदत भी आदमी सी है ||  कोई रिश्ता नहीं रहा फिर भी ....  एक तस्लीम लाजमी सी है || post scrap cancel

करोगे याद तो

करोगे याद तो हर बात याद आएगी गुज़रते वक़्त की हर मौज ठहर जायेगी ये चाँद बीते जमानों का आइना होगा भटकते अब्र में चेहरा कोई बना होगा उदास राह कोई दास्ता सुनाएगी करोगे याद तो हर बात याद आएगी बरसता भीगता मौसम धुवा धुवा होगा पिघलती शम्मों पे दिल का मेरे गुमा होगा हथेलियों की हीना याद कुछ दिलाएगी करोगे याद तो हर बात याद आएगी गली के मोड़ पे सुना सा कोई दरवाज़ा तरसती आँखों से रास्ता किसीका देखेगा उदास आँखों की नमी कुछ बताएगी करोगे याद तो हर बात याद आएगी

प्रवासी

विसरून जाव आपल्यातल 'मी' पण एकरूप होवून जाव त्या वाटेशी... वाटेवरल्या स्वप्नांशी... त्या हरवलेल्या 'मी' पणाने सांगाव आपल्याला... ही स्वप्न आपली नाहित फक्त त्या वाटेवरची आहेत वाट वळेल तशी वळणारी वाट थांबेल तशी थांबणारी या वाटेवरती 'मी' फक्त एक प्रवासी...

क्षण

एखाद्या क्षणातून बाहेर पडण्याची घाई... कधी त्याच क्षणात रेंगाळण्याचा मोह... एखादा क्षण अगदी 'वेड' होवून जगता जगता येणारया नव्या क्षणांची ओढ़ आजच्या क्षणांना... कालच्या आठवणींचे संदर्भ कालच्या क्षणांना आजच्या अनुभवांची जोड़ आणी मग परत एकदा सगळ नव्याने भेटण... आतापर्यंत काहीच समजले नसण्याच ... नव्याने जाणवण!

आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी..

आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी.. शब्दांच्या ओंजळीत तुझी आठवण धरावी…..!! आज सूर ताल सगळं काही विसरून जावं… वाटतयं आज थोडं मुक्त होउन गावं… तुझ्या आठवणींची आज इथे मैफिल भरावी… आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी….!! पुन्हा तुला आधीसारखं चोपाटीवर न्यावं… रागावरचं औषध म्हणून दिसेल ते घ्यावं…. गजरा माळताना पुन्हा तू गालात हसावी…. आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी….!! वाटतयं तुझ्या बटांमधून पुन्हा हात फिरवावा.. ह्रदयाचा तो आकार आपण वाळूमधून गिरवावा…. सहवासात तुझ्या मग वेळही ना सरावी.. आज खूप वाटतयं तुझ्यावर एक कविता करावी….!! आज खूप वाटतयं तुला जवळ घ्यावं… गालावरच्या खळीकडे मन भरून पहावं….. नेहमी सारखी तीही भेट निराळीच ठरावी… आज खूप वाटतयं तुज्यावर एक कविता करावी…!!

मृगजळाचे भास

मृगजळाचे भास गोड आठवणींमागाची रहस्य हळूहळू उलगडत जातात आणि लक्षात येतात ते मृगजळाचे भास सत्य माहित असूनही इच्छेअनुरुप स्वप्नं पाहण्याची सवय पण, उशिरा लक्षात येतात खडबडून जागे करणारे वास्तवि काटे चंद्र ढगाआड गेला म्हणून रात्रीला त्या आमावस्या म्हणत नाहीत उन्हाळ्यात पाऊस आला म्हणून त्याला पावसाळा म्हणत नाहीत एखाद्या भेटीत कोणी जरा गोड बोललं म्हणून त्याला "प्रेम" म्हणत नाहीत सगळं कळत असत पण मन वळत नसत नकाराला होकारातच बदलत असत झाले वार कितीही तरी फुलांप्रमाणे झेलत असत खूप वेड असत त्याला सावरणं अवघड खूप असत