मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकपण

माझ्या गात्रात फुटले उन्ह - कळ्यांचे तरंग चार डोळ्यांनी झालिले तुझे माझे सारे अंग ! एका शब्दाने नभाला नको करूस पोकळी झाड तोडून घावांनी केली सावली मोकळी … : एकपण : सांजभयाच्या साजणी : ग्रेस

जरूर वाचा

या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात . आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात . या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे . पुलंचे नातेवाईक , चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते . त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं . अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं . त्याचंच हे उत्तर . > १० जुलै १९५७ , - > प्रिय चंदू > रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे . तुझे पत्र वाचले . सुनीता सातार्याला बाबांकडे गेली आहे . वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो . मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही . हा ऑपेराच घे . गेले आठ दिवस मी राबतो आहे . आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला . स्वर हवेत विरून गेले . मला फक्त थकवा उरला आहे