मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तमाची तमा बाळगू मी कशाला

तमाची तमा बाळगू मी कशाला  इथे जागली स्पंदनाची धुनी  तुझे नाव घेता विरे शीण सारा  दिव्यांची जणू रोषणाई मनी  तुझ्या आठवाने उटी चंदनाची  जणू आसमंतात गंधाळते  मिळे शांततेला नवा सूर आणि  फुलें गर्द एकांत रानीवनी .  : मिलिंद जोशी 

मी

मीरेचे पैंजण  त्यात मी घुंगरू  कसें मी आवरू  ... मन माझें ? नाथांची कावड  तीत मी ओंजळ  मला ये भोवळ  ... तहानेंची .  जनाईचे जाते  त्यातले मी पीठ  झालो कसा धीट  ... भित्रा मी? मुक्ताईचे डोळे  त्यांत अश्रूबिंदू  होऊनिया स्फुंदू  ... लागलो मी.  ज्ञानियाची ओवीं  तीतला मी छंद  केली चिरेबंद  ... समाधी मी.  : सदानंद शांताराम रेगे . 

आईच्या दुःखाचं

आईच्या दुःखाचं  डोळाभर पाणी  दाटली कहाणी  आयुष्याची  शेवटी मनींचे  सांगणे राहिले  हुंदक्यांनी मुके  पंचप्राण  गलबला सोसले  सोडतांना घर  माझे महाद्वार  ओस झालें  आमुच्या संसारी  घोटाळों न मन  तिथे तरी प्राण  शांत राहों  जात्याच्या ओवीचा  संपला वेदांत  देव्हाऱ्यात  वाट  करपली.  : पानझड  : ना. धों . महानोर. 

उंच गेल्या डोंगरांच्या दोन रांगा

उंच गेल्या डोंगरांच्या दोन रांगा  माखले शेवाळ हिरवे अंगअंगा  पत्थरातुन निर्झरांचे शुभ्र पाणी  वळणवाटांनी उतरते गात गाणी  : पानझड  : ना धों महानोर 

कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती

कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती  येती नि जाती येती नि जाती नवल असे घडते काही  स्वप्नात स्वप्न पडते बाई  सख्याचा स्पर्श अनोखा हर्ष  प्रितीच्या सारिका मंजुळ गाती वाऱ्याची झुळूक बनतो झुला क्षणात ऊंच नेतसे मला सांजेचे रंग धुंद तरंग  पाचही प्राण सुखात न्हाती येते ती घटिका सुंदर आहे आनंद हृदयी भरून वाहे हिरवळ ओली पावलांखाली नभीच्या चांदण्या खुडते हाती - शांता शेळके

जीव गुंतला

कोवळ्या उन्हात जीव गुंतला मोकळ्या क्षणात जीव गुंतला सुख आले भरभरून, गेलेही राहिल्या खुणांत जीव गुंतला बोलले न प्रेम, फक्त सोसले त्या खुळ्या मनात जीव गुंतला दीप लाविला उरी कधी कुणी आजही ॠणात जीव गुंतला कळे निरोप घ्यायचा, नि घेतला तरिही जीवनात जीव गुंतला ;  अरुणा ढेरे

तळ्यांत

कसा कुणी एकाएकी  खडा फेकला तळ्यांत ; उमटल्या वलयांनी  वेडा केला उभा काठ .  झाली उलटीसुलटी  तळ्यातली क्षणात ; चुरा कोरीव लेण्याचा  विरे काठाच्या मातींत .  ओसरता एक क्षण  पुन्हा सारे थिरावेल  आणि सावध काठाशी  लाट उगा उमळेल .  : तळ्यांत  : मेंदी  : इंदिरा संत 

पाप इमानी

कधीच वठला आहे नूर  देठ फुलांचा दुःखे उगाच ; कधीच झडली  परे पारवी  उगाच खुपते आहे चोच ; कधीच झुकला आहे सूर  उगाच चढते तार गळ्याशी ; कधीच हुकला आहे नेम  उगा रुते हा तीर उराशी ; कधीच ओसरलेला पूर  उगाच वाळूंत शिंप हिमानी ; जपते ..... जपते केव्हापासून  तांबूस लाडिक पाप इमानी.  : पाप इमानी  : जोगवा  : आरती प्रभू 

चाँद तन्हा है आसमाँ तन्हा

चाँद तन्हा है आसमाँ तन्हा , दिल मिला है कहाँ - कहाँ तन्हा बुझ गई आस , छुप गया तारा , थरथराता रहा धुआँ तन्हा ज़िन्दगी क्या इसी को कहते हैं , जिस्म तन्हा है और जाँ तन्हा हमसफ़र कोई गर मिले भी कभी , दोनों चलते रहें कहाँ तन्हा जलती - बुझती - सी रोशनी के परे , सिमटा - सिमटा - सा एक मकाँ तन्हा राह देखा करेगा सदियों तक छोड़ जाएँगे ये जहाँ तन्हा।

पायाखाली वाळू

पायाखाली वाळू  जाता तुडवित  ढासळले चित्त  कणकण  ओहोटीच्या पार  लावता मी ध्यान  अचानक ऊन  मावळले  अशी भडकावी  काळजात आग  तैसा रंग राग  चोहीकडे  अपुऱ्या डोळ्यात  न मावे सोहळा  पाहिजे फाटला  उर आतां.  : पायाखाली वाळू  : शिरीष पै