मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोन ध्रुवांवर दोघे आपण

दोन ध्रुवांवर दोघे आपण   तू तिकडे अन्‌ मी इकडे वाऱ्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहिकडे दिवस मनाला वैरि भासतो तारा मोजित रात गुजरितो युगसम वाटे घडीघडी ही कालगती का बंद पडे ? वसंतासवे धरा नाचते   तांडव भीषण मज ते गमते गजबजलेल्या जगात जगतो जीवन एकलकोंडे नि:श्वसिते तव सांगायाला   पश्चिमवारा बिलगे मजला   शीतल कोमल तुझ्या करांचा   सर्वांगी जणु स्पर्श घडे स्मृति-पंखांनी भिरभिर फिरते   प्रीतपाखरू तुझ्याच भवते   मुक्या मनाचे दु:ख सागरा   सांग गर्जुनी तू तिकडे तोच असे मी, घर हे तेही तोच सखी, संसार असेही तुझ्यावाचुनी शून्य पसारा प्राण तिथे अन्‌ देह इथे

गीत हे गाशील तेव्हा, मी जगी असणार नाही

गीत हे गाशील तेव्हा, मी जगी असणार नाही प्रीत ही स्मरशील तेव्हा, मी तुला दिसणार नाही कालचे ना आज पाणी, अर्थ हे उरणार नाहीत पाहूनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही चांदणे बिलगेल अंगा, कोवळे रेशीम होऊन त्या क्षणी पाऊल माझे, हे पुन्हा फसणार नाही

सावळाच रंग तुझा

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो आणि नजरेचा चंदर् पाहू केव्हा उगवतो सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान

कभी कहा न किसी से तेरे फ़साने को

कभी कहा न किसी से तेरे फ़साने को न जाने कैसे खबर हो गई ज़माने को चमन में बर्क़ नहीं छोडती किसी सूरत तरह-तरह से बनाता हूँ आशियाने को सुना है ग़ैर की महफ़िल में तुम न जाओगे कहो तो आज सजा लूँ ग़रीबखाने को दुआ बहार की माँगी तो इतने फूल खिले कहीं जगह न मिली मेरे आशियाने को चमन में जाना तो सय्याद देखकर जाना अकेला छोडकर आया हूँ आशियाने को मेरी लहद पे पतँगों का खून होता है हु़ज़ूर शम्मा ने लाया करें जलाने को दबा के चल दिये सब क़ब्र में दुआ न सलाम ज़रा-सी देर में क्या हो गया ज़माने को अब आगे इसमें तुम्हारा भी नाम आयेगा जो हुक़्म हो तो यहीं छोड दूँ फ़साने को 'क़मर' ज़रा भी नहीं तुझको खौफ़-ए-रुसवाई चले हो चाँदनी शब में उन्हे मनाने को