मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उन्हाळा

चाफ़्याहुन तीव्र उन्हाचा वैशाखी घमघमाट  अंतर्बाह्य चुकल्या मुकल्या पक्षाचा सूर आसमंतात  सतारीवर खुडल्यासारखा पिळवटल्यासारखा सखोल; विखारलेल्या तंद्रीची कर्पूरशुभ्र लंय अस्तित्व अबोल .  तंद्रीच्याही पल्याड पापणी आड दिशा दिशा जवळलेल्या  अज्ञेयाच्या माळावरून आभाळवाटा उधळलेल्या .   : शंकर रामाणी 

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी

रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी पुसणार तू कुणाला मिटलीत सर्द दारे धारांत नाहणारी धरतीच गे ईमानी पानातुनी मनाच्या माझेच हे शहारे मातीत मातलेला आवेगही तुफानी सोसून सोसवेना गात्री अलक्ष्य धारा प्राशून पाप येते डोळ्यांत मूढ पाणी प्राणांत हूड वारे हलतेच झाड आहे त्यानीच ढाळलेली तू माळिली विराणी : शंकर रामाणी

माझिया दारात चिमण्या आल्या

माझिया दारात चिमण्या आल्या अबोल काहीसे बोलून गेल्या कळले सारे नि कळले नाही अबोध मनाची हासली जुई दाटून दिशांत उतला गंध झडली जाणीव गळले बंध प्राणांस फुटले अद्भूत पंख तंद्रीत भिनला आकाश डंख माझिया दारात चिमण्या आल्या आगळे वेगळे सांगून गेल्या : शंकर रामाणी

दिवे लागले रे

दिवे लागले रे , दिवे लागले रे , तमाच्या तळाशी दिवे लागले ; दिठीच्या दिशा खोल तेजाळतांना कुणी जागले रे ? कुणी जागले ? रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी असे झाड पैलाड पान्हावले ; तिथे मोकळा मी मला हुंगितांना उरी गंध कल्लोळुनी फाकले ... उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा कुणी देहयात्रेत या गुंतले ? आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन उष : सूक्त ओठात ओथंबले ... : शंकर रामाणी

संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा कुरळ्या लहंरीमधुनी शिळ घालतो वारा दुर कमान पुलाची एकलीच अंधारी थरथरत्या पाण्याला कसले गुपीत विचारी भरुन काजव्याने हा चमके पिंपळ सारा स्तिमीत होऊनी तेथे अवचित थबके वारा किरकीर रात किड्यांची निरवतेस किनारी ओढ लागुनी छाया थरथरते अंधारी मध्येच क्षितीजावरुनी विज लकाकुन जाई अन ध्यानस्थ गिरी ही उघडुनी लोचन पाही हळुच चांदणे ओले थिबके पाण्यावरुनी कसला क्षण सोनेरी उमले प्राणामधुनी संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा दरवळला गंधाने मनाचा गाभारा : मंगेश पाडगावकर

Bhuul shaayad bahut badii kar lii

 Bhuul shaayad bahut badii kar lii     dil ne duniyaa se dostii kar lii     tum muhabbat ko khel kahate ho     ham ne barbaad zindagii kar lii     us ne dekhaa badii inaayat se     aankhon aankhon main baat bhii kar lii     aashiqii main bahut zaruurii hai     bevafaai kabhi kabhii kar lii     ham nahiin jaanate chiraagon ne     kyon andheron se dostii kar lii     dhadakanen dafn ho gaii hongii     dil main diivaar kyon khadii kar lii

मी विझल्यावर

मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरितीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे मी विझल्यावर त्या राखेवर पण कवण्या अवसेच्या रात्री धुळीत विखुरल्या कविता माझ्या धरतील चंद्रफुलांची छत्री : बा . भ . बोरकर

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर ? जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर ? कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते ? कळत जाते तसे कशा मूर्ती सार्या झिजून जातात पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात ? कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात ? कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात ? कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव ? : बा . भ . बोरकर