मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परमेशाला गमले आपण

परमेशाला गमले आपण रूप पहावे अपुले सुंदर आणिक त्याने केला दर्पण तोच समजतो आपण सागर... विं. दा. करंदीकर - स्वेदगंगा

पुन्हा ढग दाटून येतील

पुन्हा ढग दाटून येतील पुन्हा जमीन अधीर होईल उरात श्वास घेता घेता हळूच रुतु हिरवा होईल...

बरे नाही !

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे मागचे जुने देणे टाळणे बरे नाही ऐक तू ज़रा माझे...सोड मोह स्वप्नांचा आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ? आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ ! जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता... हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ? हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही... एल्गार - सुरेश भट

आत्ता असे करू या...

नाही म्हणावयाला आता असे करू या प्राणात चंद्र ठेवू - हाती उन्हें धरु या आता परस्परांची चाहुल घेत राहू आता परस्परांच्या स्वप्नात वावरू या नेले जरी घराला वाहून पावसाने डोळ्यातल्या घनांना हासून आवरू या गेला जरी फुलांचा हंगाम दूरदेशी आयुष्य राहिलेले जाळून मोहरू या ऐकू नकोस काही त्या दूरच्या दिव्यांचे... माझ्या तुझ्या मिठिने ही रात्र मंतरू या हे स्पर्श रेशमी अन् हे श्वास रेशमाचे... ये ! आज रेशमाने रेशीम कातारू या... एल्गार - सुरेश भट

एल्गार

अद्यापही सुरयाला माझा सराव नाही अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही येथे पिसुन माझे काळीज बैसलों मी आत्ता भल्याभल्यांचा हातात डाव नाही हे दुख राजवर्खी...हे दुख मोरपंखी... जे जन्मजात दुखी त्यांचा निभाव नाही त्यांना कसे विचारू - कोठे पहाट झाली? त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती गावात सज्जनांच्या आता तनाव नाही झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे कोठेच आसवांचा बाका बनाव नाही गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री मेल्याविन मडयाला आता उपाव नाही जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी? संतांतही घराच्या राखेस भाव नाही उचारणार नाही कोणीच शापवाणी... तैसा रुशिमुनिंचा लेखी ठराव नाही साद्याच माणसांचा एल्गार येत आहे... हा थोर गान्डूळाचा भोंदू जमाव नाही ! ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही एल्गार  -  सुरेश भट 

यांचं असं का होतं कळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ? निळं निळं वेल्हाळ पाखरू, आभाळात उडणार रूपेरी वेलाण्टी घेत मासा, पाण्यात बुडणार याचं सुख नसतंच मुळी, कधी त्यांच्यासाठी एकच गोष्ट त्यांची असते ,"कपाळावर आठी" कधीसुद्धा यांची पापणी ढळत नाही यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ? मोठ्याने हसा तुम्ही, त्यांना नैतिक त्रास होतो वेलची खाल्लीत तरी, यांना व्हिस्कीचा वास येतो. यांचा घोषा सुरू असतो, "अमकं खाणं वाइट की डोकं जडसं होतं" "तमकं मुळीच पिऊ नका, त्याने नक्की पडसं होतं" संयमाचे पुतळेच हे, त्यांचं मन चुकूनही चळत नाही यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ? सगळेच कसे बागेमधे, व्यायाम करीत बसणार? किंवा हातात गीता घेऊन, चिंतन करीत बसणार? बागेतल्या कोप-यात कोणी, घट्ट बिलगून बसतंच ना? गालाला गाल लाऊन, गुल गुल करीत असतंच ना? नैतिक सामर्थ्याचं त्यांच्या वेगवान घोडं असतं पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं ! या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत ना

यात काही पाप नाही!

सिगारेटचा जेंव्हा तुम्ही मजेत घेता मस्त झुरका आवडलेल्या आमटीचा आवाज करीत मारता भुरका विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकरणं याच्यासारखा दुसरा शाप नाही जबरदस्त डुलकी येते धर्मग्रंथ वाचता वाचता लहान बाळासारखे तुम्ही खुर्चीतच पेंगू लागता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकरणं याच्यासारखा दुसरा शाप नाही देवळापुढील रांग टाळून तुम्ही वेगळी वाट धरता गरम कांदाभजी खाऊन पोटोबाची पूजा करता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकरणं याच्यासारखा दुसरा शाप नाही प्रेमाची हाक येते तुम्ही धुंद साद देता कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता विश्वास ठेवा यात काही पाप नाही आनंदाने जगायचं नाकरणं याच्यासारखा दुसरा शाप नाही -- मंगेश पाडगावकर

गाणं आपलं!

को-या को-या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं ! ती मनात झुरते आहे, तुम्ही पहात बसणार. कल्पनेतल्या पावसात नुसतेच नहात बसणार ! मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? घट्ट जवळ घेतल्याखेरीज माणूस नसतं आपलं ... को-या को-या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं! शब्द शब्द, रिते शब्द, त्यांचं काय करणार? तळफुटक्या माठामध्ये पाणी कसं भरणार? मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं ... को-या को-या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं! करून करून हिशेब धूर्त, खूप काही मिळेल, पण 'फूल का फुलतं?' हे कसं कळेल? मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? फुलपाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं ... को-या को-या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं! मातीमधल्या बीजाला एकच अर्थ कळतो; कोंब फुटून आल्यावरच हिरवा मोक्ष मिळतो !! मला सांगा व्हायचं कसं? मुक्कामाला जायचं कसं? आतून आतून भिजल्याखेरीज रुजणं नसतं आपलं ... को-या को-या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरी

तारुण्य!

तारुण्य! ज्वलंत धमन्यांच अविरत स्पंदन ! निसर्गान मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर ! जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग ! निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत ! मनाच्या मयुराच्या पूर्ण पसरलेला पिसारा ! फुललेल्या शरीर भुजन्गाला डौलदार असा टीपकेदार फणा ! भावनांच्या उद्यानातिल धुंद केवडा ! विश्वकर्त्याच्या अविरत धावणारया राथातिल सर्वात ऐटदार घोड़ा ! मानासान मानान मिरवण्याचा काळ ! काहीतरी मिळवण्याचा काळ ! शक्तीचा आणि स्फुर्तिचा काळ ! काहीतरी कराव अस खरया खरया अर्थान वाटणारा ध्येयवेडा काळ !

प्रेम म्हणजे नक्की काय असत ?

प्रेम म्हणजे नक्की काय असत ? एकमेकांबद्दल वाटणार शारीरिक आकर्षण ? की शारीरिक आकर्षणाबरोबरच वाटणार मानसिक आकर्षणही ? की त्याही पलिकडे तीसर काहीतरी ! आजवर अगणिक प्रतिभावंतांनी हे कोड उलगडायचा आपापल्या परिन प्रयत्न केला आहे. पण तरीही हे गूढ़ कुणालाच उकललेल नाही. निरनिराल्या वयात प्रेमाची वेगवेगळी रूप आकारात येतात. त्या त्या वयात ती तितकीच खरी अन् उत्कट असतात. मात्र, उमलत्या वयातल प्रेम हे अजब गारुडच आहे. त्यातली कोवळीकता... त्यातल अनावर झेपावण... त्यातली नवथर हुरहुर... जणू सगळ आभाळ कवेत आलेल असत त्यावेळी ! हळूहळू वय वाढत जात. स्वप्न आणि वास्तवाची गाठ पड़ते. धूसर स्वप्नगाण विरत जात. तरीही ते बेधुंद क्षण आपला पाठलाग सोडत नाही. भूतकाळ भविष्याच्या मानगुटीवर बसतो. आणि मग ..... वर्तमान सैरभैर होतो....

मैत्री - मैत्रिणी

शाळा - कोलेजातली मुलांची जिवलग मैत्री पुढे वर्षानुवर्षे टिकू शकते. आयुष्याच्या प्रवाहात वाटा वेगळ्या झाल्या, तरी जुने मित्र वेळात वेळ काढून एकमेकाना भेटू शकतात... पण मैत्रिणी ??? मुलीना शाळा कोलेजातच ठावुक असत की ही मैत्रीच न्हवे, तर आपल सद्याच नावही अल्पजीवी आहे...तसा 'संस्कारच' होतो आसपासच्या वातावरणातुन, मग मैत्री फूलते तीच मर्यादांच्या चौकटीत..."Expiry Date" सह ...जुन्या भावबंधनांनाही लग्नाबरोबर तिलांजलि दिली जाते... अर्थात, त्यानंतरही काही भाग्यवान मैत्रिणीचे स्नेहसंबंध टिकून रहातात. पण त्यात पुरुषी मैत्रीसारखी मोकळीक रहात नाही... अश्या नात्याच अस्तित्वच समाजाने फारश्या गांभिर्याने स्विकारलेल नसत...

एकटेपण...एकाकीपण...

कुठलाही संवेदशील मनुष्य गर्दित, अगदी जवळच्यांच्या गोतावल्यातही कधी कधी एकटाच असतो. माणसाच एकटेपण, कधी परिस्थितीने लादलेल, तर कधी त्यान स्वताहून ओढून घेतलेल.  या एकटेपणाची काही तर्र्हा व्यक्ति व्यक्तिगाणिक बदलणारया ! पुन्हा एकटेपण आणि एकाकीपण ह्यात फरक आहेच. एकटेपण काहींना मुद्दाम हवस वाटत. पण एकाकीपण कोणालाच नकोस असत...

चांदण चांदणच असत...

चांदण चांदणच असत. त्याला ग्रेड्स नाहित. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अंहकार नाही. अंहकार नाही म्हणुन गोंगाट नाही. ते नम्ब्र असत. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जीतक प्रखर तितक सौम्य. चंद्राइतक औदार्य माणसाला मिळवता येईल का? अमावास्येला स्वताच अस्तित्वही न दर्शविण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो ... :  व पु काळे 

चांदण्याचा थेंब

मी फुले ही वेचताना सांज झाली दूर रानातून त्याची हाक आली थांबली भांबावुनी ही सर्व झाडे सावल्यांच्या भारलेल्या हालचाली कापर्‍या तंद्रीत कोणी स्वप्नपक्षी हालल्या भासापरी रानी मशाली टाकुनी सारी फुले ही धावले मी चांदण्याचा थेंब माझ्या एक गाली ;  मंगेश पाडगांवकर

पांगलेला पावसाळा

पांगलेला पावसाळा,  वाट भरलेली धुळीने  मोडक्या फांदीस घरटे,  वाळलेली शुष्क पाने.  दूर गेल्या पायवाटा  डोंगराच्या पायथ्याशी  पंख मिटल्या झोपड्यांचे  दु:ख कवटाळे उराशी...

तुम पूछो और में न बतावु ऐसे तो हालात नहीं

तुम पूछो और में न बतावु ऐसे तो हालात नहीं बस, जरासा इक दिल है टुटा और कोई बात नहीं... : गालिब 

पूछा जो उसने हाल तो आँखों से टूटकर

पूछा जो उसने हाल तो आँखों से टूटकर छोटासा इक अश्क बड़ा काम कर गया  - जफ़र गोरखपुरी 

प्रेम म्हणजे ???

पुरे झाले चंद्रसूर्य पुरे झाले तारा पुरे झाले नदीनाले पुरे झाला वारा मोरासारखा छाती काढून उभा रहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय? डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय? उन्हाळ्यात ढगासारखा हवेत रहाशील फिरत जास्तीत जास्त बारा महीने बाई राहील झुरत नंतर तुला लागिनचिटि आल्याशिवाय राहील काय? म्हणुन सांगतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाण प्रेम म्हणजे जंगल होउन जळत रहाण प्रेम कराव भिल्लासारख बाणावरती खोचलेल मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यंत पोचलेल... शब्दांच्या या धुक्यामाद्ये अडकू नकोस बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधालूं दे तूफ़ान सगळ काळजामाद्ये साचलेल प्रेम कराव भिल्लासारख बाणावरती खोचलेल मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यंत पोचलेल... : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

मैत्री...

मैत्रीचे अथवा प्रेमाचे नाते कसे नकळत सांधले जातात. मैत्रीच्या नात्यात बसलेल्या व्यक्तीकडे पाहताना कळत की निवडीचे सारे निकष बदलत गेलेत आपोआप...कल्पनेहून वेगळे ... आवड निवड वेगळी... तरीही परस्परांना उमजत जातो आपण... कारण कुठलासा आतला सूर जुळलेला असतो. आपणही आपल्या नकळत बदलत जातो. नात्यातल्या अपेक्षा किती कुचकामी असतात ते कळत... आणि... माणसे आहेत तशी स्विकारायला मन तयार होत...   post scrap cancel

जगण्यासाठी आधाराची गरज असते का?.....

जगण्यासाठी आधाराची गरज असते का? ज्याला आपण आधार मानतो तो खरोखरच आधार असतो का? गडद अंधारातून प्रकाशात येताना सुद्धा हा एकटेपणाच आपली सोबत करतो. तर मग उजेडातल्या प्रवासातच ही आधाराची वेडी तहान का? जिच्यावाचुन असह्य व्हाव अशी तिची मिजास का? तस पाहिल तर, ज्यांचा आधार आपण शोधतो ते तरी कुठे समर्थ असतात. ते देखील आपल्यासारखे कालोखात चाचपडत असतात. तरी देखील त्यांच्या हाताची उब आपल्याला का हवी असते? गम्मत म्हणजे आपल्या खांद्यावर देखील कुणाचीतरी मान विसावू पहाते. तर मग आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का ? जगण्यासाठी आधाराची गरज असते का?.....

कढ

कुणी निन्दावे त्यालाही करावा मी नमस्कार कुणी धरावा दुरावा त्याचा करावा सत्कार काही वागावे कुणीही मीच वागावे जपून साम्भाळण्यासाठी मने माझे गिळावे मीपण कित्येकान्ना दिला आहे माझ्या ताटातील घास, कितिकान्च्या डोळ्यातील पाणि माझ्या पदरास! आज माझ्या आसवांना एक साक्षि ते आभाळ मनातील कढासाठी एक  आधार प्रेमळ इन्दिरा संत

हयात इक मुस्तकिल गमके सिवा कुछ भी नहीं...

हयात इक मुस्तकिल गमके सिवा कुछ भी नहीं... खुशीकी याद भी आती है तो, आँसू बनके आती है... - साहिर लुधियानवी

क्योंकर न लिपटके तुझसे सौऊ ऐ कब्र...

क्योंकर न लिपटके तुझसे सौऊ ऐ कब्र... मैंने भी तो जाँ देके पाया है तुझे... - अनीस

मुश्किलें गमोंकी खुशीसे काट दे, इंसा है वो...

मुश्किलें गमोंकी खुशीसे काट दे, इंसा है वो... कुछ नहीं, पहलू में इक हसताहुआ दिल चाहिए... - शमीम मलीहाबादी

जिसको कभी जानाही नहीं हम उसको खुदा क्यों माने ?

जिसको कभी जानाही नहीं हम उसको खुदा क्यों माने ? और जिसे जान चुके है, वो खुदा कैसे हो ?????

अगर अश्कोंसेभी कोइ न समझे मुद्दआ इनका .....

अगर अश्कोंसेभी कोइ न समझे मुद्दआ इनका ..... तो इसके आगे है मजबूर मेरी बेजुबाँ आँखे .....

कुणी उत्तरं शोधतं का ?

स्वतःभोवती सतत असं गरगर फिरत राहिलं की, भोवळ हेच उत्तर असेल तुझ्या सगळ्या प्रश्नांचं . प्रश्न तरी कशासाठी सारखे उभे करायचे ? हल्ली तर यशस्वी उत्तरांची पुस्तकंही तयार मिळतात. प्रश्नांच्या या छळणाऱ्या जुनाट आजारावर एक अगदी गावठी असा अनुभवी उपाय आहे : उपाय पुरा गावठी, त्याला प्रतिष्ठा मुळीच नाही, शहाणी माणसं पूर्वापार हाच उपाय करीत आली आहेत. उपाय तसा अगदी साधा, कष्टांची कटकट नाही : सगळे प्रश्न नाचणारे मोर समजून अंगणात सोडावेत; पिसारे फुलवून मोर थुईथुई नाचू लागतील, आता सांग, नाचताना मोर कुणी उत्तरं शोधतं का ? -मंगेश पाडगावकर

दिशादिशातूनी येती उले

दिशादिशातूनी येती उले गगनाचे ग दार खुले मौनाची ही झडवीत पाने आवाजाचे झाड फुले! झिळमीळ झिळमीळ सायंकाळी नदी सुरान्ची कान्ती माळी काळजातूनी खळखळणार्‍या ओहोळालाही ताल मिळे! लख्ख अशी ही वीज चमकली आभाळाने पाटी पुसली मग डोहाच्या नितळ मनावर अक्षरलेला चन्द्र गळे! आभाळातून मेघ वितळले धरणीचेही अंग शीतळले झिडपीत पाणी केसान्मधले काठावरती माड झुले! कण कण ओला होऊन गेला साजण येता हा अलबेला नव्या बीजाला अंकुर फुटला कुमारिकेची कूस फळे! अशाश्वताच्या या गर्भातून ऐक उद्याची सळसळते धून या निर्मोही जन्मामधुनी जगण्याचे वरदान मिळे!  श्री. विष्णू सूर्या वाघ

पाऊस

कसा मातला मातला, शेता-शेतात पाऊस मला बिलगून राही, नको साजणा जाऊस कसा साठला साठला, माती-मातीत पाऊस प्रितीत जा भिजऊनी, नको ओलेता राहूस कसा दाटला दाटला, बीजा-बीजात पाऊस गारठोनी गेली काया, नको विरह साहूस कसा फाटला फाटला, नभा-नभात पाऊस बिजलीचा खेळ माझ्या गात्रा-गात्रांत उरूस

माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे|| माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फ़णसाची रास, फ़ुली फ़ळांचे पाझर फ़ळी फ़ुलांचे सुवास|| माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी|| माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा|| माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा|| माझ्या गोव्याच्या भूमीत चाफ़ा पानाविण फ़ुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले|| माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळीचा रे भात, वाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा हात|| माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, आतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी|| बा. भ. बोरकर

गंधातुन गूढ़ उकलते...

ते किती लपविले तरीही मज नकळत कळते कळते पाकल्यात दडले तरीही गंधातुन गूढ़ उकलते... मातीत गाढ निजलेले जरि बीज न नयना दिसते घन घळता आषाडाचे मज नवखी चाहुल येते... रात्रीच्या घन अंधारी जरि गहनच सगळे असते ते निशब्दाचे कोडे मज नक्षत्रातुंन सुटते... श्रावणात चित्रलिपिचे जरी अर्थ न कळले पुरते तरी रुतुचक्रापलिकडचे प्राणात उमलते नाते... लहरितुन थरथरणांरया जरी भुलवित फसवित पळते पावसात उत्तररात्री मज अवचित लय उलगडते... प्रतिबिबच अस्फुट नुसते जरी शब्दातून भिरभिरते मौनात पारी रुदईच्या कधी पाहात होवुनी येते... दूरात पलिकडे जेव्हा हळू गगन धरेला मिळते ते अद्भुत मन कळल्याची वेदनाच नुसती उरते... ते किती लपविले तरीही मज नकळत कळते कळते पाकल्यात दडले तरीही गंधातुन गूढ़ उकलते... मंगेश पाडगावकर 

जीवनयात्रा

अशीच असते जीवनयात्रा शूल व्यथांचे उरी वहावे... जलत्या जखमान्वरति स्मितांचे गुलाबपानी शिम्पत जावे...