मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीव गुंतला

कोवळ्या उन्हात जीव गुंतला मोकळ्या क्षणात जीव गुंतला सुख आले भरभरून, गेलेही राहिल्या खुणांत जीव गुंतला बोलले न प्रेम, फक्त सोसले त्या खुळ्या मनात जीव गुंतला दीप लाविला उरी कधी कुणी आजही ॠणात जीव गुंतला कळे निरोप घ्यायचा, नि घेतला तरिही जीवनात जीव गुंतला ;  अरुणा ढेरे

तळ्यांत

कसा कुणी एकाएकी  खडा फेकला तळ्यांत ; उमटल्या वलयांनी  वेडा केला उभा काठ .  झाली उलटीसुलटी  तळ्यातली क्षणात ; चुरा कोरीव लेण्याचा  विरे काठाच्या मातींत .  ओसरता एक क्षण  पुन्हा सारे थिरावेल  आणि सावध काठाशी  लाट उगा उमळेल .  : तळ्यांत  : मेंदी  : इंदिरा संत 

पाप इमानी

कधीच वठला आहे नूर  देठ फुलांचा दुःखे उगाच ; कधीच झडली  परे पारवी  उगाच खुपते आहे चोच ; कधीच झुकला आहे सूर  उगाच चढते तार गळ्याशी ; कधीच हुकला आहे नेम  उगा रुते हा तीर उराशी ; कधीच ओसरलेला पूर  उगाच वाळूंत शिंप हिमानी ; जपते ..... जपते केव्हापासून  तांबूस लाडिक पाप इमानी.  : पाप इमानी  : जोगवा  : आरती प्रभू