मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रात्र

काही योजून मनाशी  दणादणा आली रात्र  रिघे दारागजांतून  काळी हत्तीण मोकाट.  देते भिंतींचा धडक :  कोसळला चिरा चिरा ;  उस्कटल्या कौलाराच्या  केला खापरीचा चुरा ;  नीट लाघव वस्तूंचा  डाव टाकला मोडून :  इथे पलंगाचा खूर  तिथे भग्न पानदान;  उधव्स्तान्त उभी तृप्त  काळ्या मत्सराची गोण :  कशी तिला कळायची  माझ्या श्रीमंतीची खूण ! : रात्र  : रंगबावरी  : इंदिरा संत 

एक बोट धर पाहू

मोरपिसासारखी दोन बोटे डोळ्यावर फिरवून  ती माझ्यापुढे नाचवीत  एकदा तू म्हणालीस:  एक बोट धर पाहू.  मी विचारले : का? कशासाठी ?  तू म्हणालीस : मुकाट्याने बोट धर आधी.  सुलताना रझियाच्या गुलामाच्या आदबीनं  मी तुझे बोट धरले.  बोट सोडवून घेतलेस आणि टाळी वाजवलीस.  तेव्हा मात्र दचकलो:  हा तर शिरच्छेदाचा संकेत.  माझे भय कधीही खोटे बोलत नाही.  तू म्हणालीस : बिचारा तू  न धरलेल्या बोटावर तुझे नाव होते !!!! : वसंत बापट 

कविता : मन

अंधारात आपणंच अंधार होऊ शकत नाही.  दुःख प्यायलाही दुःखाची ओंजळ लागते .  कवितेत मानवी मनाचे सूक्ष्मांत सूक्ष्म तरंग असतात.  सतत जे जवळ होतं  कुणालाही कळत नव्हतं  ते माझं .. फक्त माझं मन होतं .....  मनातले सल सांगायला माणसाची सोबत अपुरी वाटू लागली कि मन शब्दांच्या पाऊलवाटेकडे वळतं.  शब्दचं आधार होतात ! शब्दचं श्वास होतात ! शब्दच निःस्वास होतात! अशा शब्दातूनच व्यक्त झालेली निर्मिती हि जणू कलावंताचं शब्दरूप मनचं असतं.  अशी मन चुरगळणारी पाशवी मन भोवती असतात.  ज्यांना आपल्या सानिध्यात असलेल्या अशा तरल मनाची पर्वा नसते .  इतकचं काय , अशा हळुवार जगण्याचं पायपुसणं करण्यांतच अनेकांना पुरुषार्थ वाटतो ! मग आयुष्यातील सुखदुःखाची सखी जी कविता त्या कवितेबद्दलही बधिर सहचाराला  मत्सर वाटू लागतो . "आपल्या व्यतिरिक्त कोणाची सोबत या मनाला लाभेलच कशी?"या  आकसापोटी कवितेंच्या कळ्यांचे श्वास , निःश्वास खुडून टाकण्यात काहींची उभी हयात जाते. 

गझल

गीत गुंजारते जीवनाचे गझल  मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल  भावनेला मुक्या बोलवेना जिथे  नेमकी वेदना तीच वाचे गझल 

वीज

नका मलीन मार्गाचा  सांगू दिमाख मजला  मला आकाश- ज्योतीला  शांत सुखाची शृंखला ! वैर सुस्थिरपणाचे  वैर स्तिथीचे निवान्त  दहा दिशांचा प्रदेश  माझ्या धावेस अशांत  सुख थिजले भिजले  नित्यपणात गंजले  अभिलाषा न अश्याची  स्वैरपणात रंगले ! जातें जळत जाळत  कृष्ण घनांच्या कुशीत  नाच काळोखावरती  कधी करते खुशीत ! माझ्या हातात मशाल  माझ्या मनात निखारा  माझ्या बेहोषपणाला  नाही कोठेही किनारा ! न मी नक्षत्रादिपीका  कोणा देवाच्या पूजेची  राणी सोज्वळ सात्विक  नाही कोणाच्या शेजेची ! मला अनेक वल्लभ  नाही कोणीही भ्रतार  दान दास्यांचे करील  त्यास दाहक कट्यार ! नाही पाखराप्रमाणे  घरकुलात निवास  माझा निःसंग निर्भय  साऱ्या विश्वांत विलास! सूर्यतेजात चंद्राचे  काही किरण रापले  झंजावाताचे सहस्त्र  वेग तयांत मापले ! माझ्या जन्माची कथा ही  कसे साहीन बंधन ?  तीरांवाचून वाहते  माझे तेजाळ जीवन ! : वीज  : मराठी माती  : कुसुमाग्रज 

नौका

सरवस्तीच्या नौका या  युगयात्रेस निघाल्या  शुभ्र शिडांच्या पाकळ्या  महाशून्यांत फुलल्या.  करी हर्षाची लावणी  मंद सुगंध समीर  लाल तेजाने कोंदले  निळे नभाचे मंदिर  रत्नाकरात हेलावे  हिऱ्यामाणकांचे पाणी  गाई वत्सल किनारा  आशीर्वचनांची गाणी  चार दिशांच्या देवता  उभ्या देहलीवरती  हाती मेघांची तबके  त्यांत ज्योतींची आरती  अश्या सोहळ्यात झाले  खुले अपाराचे द्वार  तिन्ही काळांचा रंगला  धुंद झपुर्झा समोर  नौका चालल्या चालल्या  दूर बंदरापासून  जीवापासून जाहले  आत्ता वेगळे जीवन  हीन मलीन नश्वर  सारे किनाऱ्यास गळे  दिव्य प्रतिभेची ज्योत  युगायुगांत पाजलें  : नौका  : मराठी माती  : कुसुमाग्रज 

सारेच हे उमाळे आधीच योजलेले

सारेच हे उमाळे आधीच योजलेले सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले! सांभाळतात सारे आपापली दुकाने; माझेच हे दिवाळे काढून लोक गेले! मी हा भिकारडा अन्‌ माझी भिकार दु:खे; त्यांचे हुशार अश्रू आधीच गाजलेले! माझी जगायची आहे कुठे तयारी ? त्यांच्या नकोत युक्त्या जे जन्मताच मेले! माझ्या शिळ्या भुकेची उष्टी कशास चर्चा? जे घालतात भिक्षा तेही उभे भुकेले आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे? येतात जे दिलासे तेही उगाळलेले! :  सुरेश भट 

हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही

हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही दिवस आमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही हे खरे की आज त्यांनी, घेरले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर, एकही रडणार नाही सांगती जे धर्म जाती, बांधती ते रोज भिंती पण उद्याचा सूर्य काही, त्यामुळे फसणार नाही छान झाले दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली यापुढे वाचाळ दिंडी, एकही निघणार नाही आजचे आमुचे पराभव, पचवितो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही : सुरेश भट 

उपकार

  एक जन्म पुरतोय ईश्वरा नको तुझे उपकार पुन्हा खूप तुझे कर्तुत्व पाहिले नको नवे अवतार पुन्हा खोल तुझ्या बाणाचा पल्ला माझ्या हळव्या हॄदयाशी सावज असुनी सुसखाअन्त होता कोसळतो प्रतिकार पुन्हा एके काळी होतो राजा शब्दगणांच्या राज्याचा कंगालांचा भरतो आहे आजकाल दरबार पुन्हा सूडाने मी विरोधातल्या पक्षाला मतदान दिले हातोहात कसे सावरले निलाजरे सरकार पुन्हा दासबोध वाचून उघडले घर मी सगळ्यांच्यासाठी आता रचतो आहे माझे रस्त्यावर घरदार पुन्हा गहाणही सर्वस्व ठेवले सुखशांतीच्या पेढीवर जमले तर आल्या बाजारी स्वतःसही विकणार पुन्हा देवदूत अन अतिरेक्यांच्या मधुचंद्राची गोची का मध्यस्थी माणूस मरावा , सावरेल संसार पुन्हा :  सुरेश भट

पाठ

सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले? खातरी झाली न त्यांची... ते घरी डोकावले! हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती... कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले? ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे (शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!) मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले? जीवना रे, एकदाही मी न टाहो फोडला पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले! वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे माझियामागे भिकारी शब्द सारे धावले! वार झेलायास केली मी खुली छाती जरी नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले! :  सुरेश भट

जयहिंद आणि जयजवान

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला, नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला विरतेची भारती या ना कमी झाली कधी, आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद, बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो, देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो धर्माहुनी श्रेष्ठ आपल्या देशास जो या समजला, मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला, अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे, कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा, पाहिली नसतील जर का बुजगावणी यांना बघा पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे, नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची, फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही, बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही :  भाऊसाहेब पाटणकर

पाऊस

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही, तुला बोलावता पोचायचा पाऊसही पडे ना पापणी पाहून ओलेती तुला, कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला, कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा, कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही कशी भर पावसातही आग माझी व्हायची, तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा, कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही : संदीप खरे.

मनातलीचे श्लोक

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने मला एकटेसे आता वाटताहे, कुणालाच जे सांगता येत नाही असे काहीसे मन्मनी दाटताहे. असे वाटते की तुझ्या पास यावे तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे, परंतू मला वेळ बांधुन नेते कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे. नको वाटते वाट ह्या पावलांना नको हालचाली... तनाच्या... मनाच्या, नकोसे शुभारंभ ध्येया - भियाचे नकोशाच गप्पा आता सांगतेच्या... असे वाटते की कधी कोणी नव्हतो न आहे, न वाहे उरातुन श्वास, उरा - अंतरातुन यांत्रिकतेने फिरे फक्त वारा... किंवा तो ही भास! न ठावे किती वेळ चालेल खेळ न ठावे किती चावी या माकडाची, जशी ओढती माळ तैशीच मोजू भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची. सये पाय दगडी नि दगडीच माथा अशा देवळातून जाऊन येतो, न देई कुणा घेतल्यावीण त्याला नमस्कार नेमस्त देउन येतो. दिसे जे कवीला न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे, मला तू न दिसशी परंतू तयांच्या नशिबी कसे सांग तुजला पहाणे. असे वाटणे ही अशी सांज त्यात दुरावा स्वत:शी तुझ्याशी दुरावा, किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात मिठीतुन देईन सगळा पुरावा. :  संदीप खरे

जाणता राजा

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥ आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ । सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥ नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥ धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर । सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥ तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली । सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥ देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥ उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥ या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥ आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती । धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥ कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले । कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥ तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही

मी

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; कधी वाढता वाढता व्योम व्यापी कधी धावतो विश्व चुंबावयाला कधी आपणाला स्वहस्तेच शापी कधी याचितो सत कधी स्वप्न याची कधी धावतो काळ टाकुन मागे कधी वर्षतो अमृताच्या सरी अन कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे कधी दैन्यवाणा, निराधर होई कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी कधी गर्जतो सागराच्या बळाने; कधी कापतो बोलता आपणाशी! कधी आपणा सर्व पिंडात शोधी; कधी पाहतो आत्मरुपात सारे; कधी मोजीतो आपणाला अनंते अणुरुप होती जिथे सुर्य, तारे टळेना अहंकार साध्या कृतीचा; गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे; कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे! कधी सत्य ते वाटते सोंग साचे! कधी संयमी, संशयात्मा, विरागी कधी आततायी, कधी मत्तकामी असा मी... तसा मी... कसा मी कळेना; स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी! : विंदा करंदीकर

हसलो म्हणजे

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी; हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही. हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही; हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही. हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते; हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही. हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे; हसतो कारण सत्याची मज भिती नाही हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही. :  संदीप खरे

चुक

क्षणोक्षणी चुका घडतात, आणि श्रेय हरवून बसतात. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात. कणभर चुकीलाही आभाळाएवढी सजा असते, चुक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायची नसते एक कृती, एक शब्द एकच निमिष हुकतं-हुकतं उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी! : सुधीर मोघे

दर्जेदार

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता? जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता! हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला? मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता! गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते... हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता! ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे.. (त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!) स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता! गाडल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा ह्या स्मशानाच्या धन्यांचा देव ताबेदार होता! लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना (एरवी, त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!) चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू मी न केला ओरडा... तो चोर अब्रूदार होता! पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकर्‍याचा लोकहो, माझा तरीही खून दर्जेदार होता! :  सुरेश भट

एखाद्याचे नशीब

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं, काही  ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं; काही  जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें, एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें । कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला, कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला; कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते, एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते ! झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती, स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती; सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते, एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते ! चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी, एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला, देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला ! :  गोविंदाग्रज

लावण्य

असे काहीतरी आगळे लावण्य केव्हा कधीकाळी दिसून जाते वेगळ्या सौंदर्य-पर्युत्सुक जीवा जन्मांतरीचे सांगत नाते नसते निव्वळ गात्रांची चारुता त्याहून अधिक असते काही ठाव त्याचा कधी लागत नाही आणि आठवण बुजत नाही रुप रेखेत बांधलेले तरी मोकळी खेळते त्यातून आभा डोळ्याआडाच्या दीपज्योतीहून निराळी भासते प्रकाशप्रभा आधीच पाहिले पाहिले वाटते पहिलेच होते दर्शन जरी स्मरणाच्या सीमेपलिकडले कुठले मीलन जाणवते तरी पुन्हा तहानेले होतात प्राण मन जिव्हाळा धाडून देते जागच्या जागी राहून हृदय प्रीतीचा वर्षाव करून घेते ! :  अनिल