मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवी कोण ?

देवलसी  जीव सदाचा उदासी     फुकाच्या सुखासी पार नसे  भावनेला फुल भक्तीचा गोसावी    दिसे तसे गोवी काव्याभासे  लोण्याहून मऊ मायेचे अंतर     दुर्बळा अंतर देत नसे  देवाचे संदेश उचलुनी दावी     विश्वासी सुखवी आत्मज्ञानीं  मनाने बालक बुद्धीने जो वृद्ध     तोडितो संबंध जगे जरी  सोंदर्याचा भोगी जीवनी विरागी     निद्रेतही जागी जगासाठी  कर्तव्याची चाड कुडीच्या परीस     दगडा परीस  करू शके  मतीने कृतीने  युक्तीने निर्मळ     तेजाने उजळ करी जना  हाच खरा कवी प्रीत पाझरवी     तेजे दीपें रवी ईश्वर हां  : कवी कोण ? : चांदणवेल  : बाळकृष्ण भगवंत बोरकर 

देहत्व

बुडे दीस ; मागें  काळानिळा अस्त : वैराण डोळ्यांत समंधाची गस्त  एकाच प्राणाचे कित्येक किनारे  घुंडून पडले बरगड्यात  वारें  दाटोनियां येते  बारापुढे रात ; तोवरी तेवेना देहत्व प्रेतांत   : देहत्व  : दिवेलागण  : आरती प्रभू 

पान पडतांच

चंद्र आला डोईवर  गाव आला हाकेवर  असेल ग झोपलेला  बाळ तुझ्या मांडीवर  कशी सरळ न वाट  पुढे नदीचे वळण  पांच वातीतील एक  तेवतसेल अजून  झाडांझाडांतील वारा  सळसळे जरा जरा  लगबग येशील ग  पान पडतांच दारा  : पान पडतांच  : दिवेलागण  : आरती प्रभू 

मन

वाकडा घुमट वाकडी फांदी  वाऱ्यास सरळ वाहोच नेदी  पाणीही वाकडे वाहून गेले  झाकल्या मनाचे कोपरे गेले  : मन  : दिवेलागण  : आरती प्रभू 

एक इच्छा

दूधभोळ्या केसरांना फक्त ठावें  का दवाच्या बोबड्या बोलां जपावे या तनूच्या मूठमातीतून देवा  फक्त चोंचितील उष्टे बीज ठेवा  : एक इच्छा  : दिवेलागण  : आरती प्रभू 

चंद्र

दूर तेथे ... दूर तेव्हा सांज झाली  दूर तेथे आपलीही लाज गेली  एक तू अन एकला  मी एक झालो  एक होतांना घनाच्या आड गेलो  झाकला लाजून तूं गे गाल डावा  त्या घनाच्या आड होता चंद्र तेंव्हा  : चंद्र  : दिवेलागण  : आरती प्रभू 

पावरी

फिके फिके रंग व्हावे गर्द गर्द निळे  डोळे डोळ्यांत  तसेच झाकून राहिले  तुझ्या माझ्या अस्तित्वाची स्तब्ध रानजाळी  एकदाच उजळेल मरणाच्या वेळी  रंग रंगांत  तोंवरी गर्दसे वाहूं दे  प्राण होऊन पावरी वाजत राहूं दे  : पावरी  : दिवेलागण  : आरती प्रभू 

राजा

फाटका संसार येथे : स्वच्छ आसूं  पक्व श्वासांची मिठाई काळजाला  स्वच्छ अश्रूंनी पूजावे येथ पुष्पां  हे खरे अन हेच राजे येथ भोती  देव जन्मा घालिताहे हेच राजे  त्यांतला मी गोधडी मांडून आहे  : राजा  : दिवेलागण  : आरती प्रभु 

आंदणवेल

चांदणकाळी आंदणवेल  दल दल फुलते रंजनवेल  आनंदाला फुटून फांद्या   निळे पाखरू घेते झेल  चांदणकाळी सलते सुख  धूप कसे दरवळते दुःख  चंद्रमणीसा शब्द निथळुनी  डुले घेउनी छंद अचूक  चांदणकाळी झुलतो पूल  थडगेदेखील बनतें फुल  शिळेंशीळेवर स्वप्नकळेचे  रत्नोपम उमटे पाऊल  चांदणकाळी आंदणवेल जग सगळे टिपऱ्यांचा खेळ सृष्टीवरती करिते वृष्टी  स्वरपुष्पांची अमृतवेल .  : आंदनवेल  : चांदणवेल  : बाळकृष्ण भगवंत बोरकर