मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला
मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना
खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुनी का मन तडफड होई
पाळणा म्हणे अंगाई
आयुष्याला नको सावली काळी
इश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला
कवी - ना. धों. महानोर
खूप छान...
उत्तर द्याहटवा"खोप्यात जिथे.." हा अंतरा या पोस्टमुळे माहित झाला. धन्यवाद!!