ओथंबून आलेले पावसाळी आभाळ ,
घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ,
काहूरभरला व्याकुळ वारा
मनोमनीच्या छेडतो तारा ,
उलगडते जवळची आभाळी शाल ,
काठावर केवळ मनस्वी फुलमाळ ...
डोळ्यांतले सारें मानेवर टिपते ,
घडी घालून बाजूला ठेवते .
: घडी
: चित्कळा
: इंदिरा संत
घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ,
काहूरभरला व्याकुळ वारा
मनोमनीच्या छेडतो तारा ,
उलगडते जवळची आभाळी शाल ,
काठावर केवळ मनस्वी फुलमाळ ...
डोळ्यांतले सारें मानेवर टिपते ,
घडी घालून बाजूला ठेवते .
: घडी
: चित्कळा
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा