डोळेभेटीची ओळख चारचौघांत विसर दाट पानांत लपव भित्री श्रावणाची सर फुलपंखी कुजबुज ठेव ओठात मिटून वर निबर शब्दांची रास ठेवावी रचून पापण्यांची गूढ भाषा अर्थ तुला मला ठावें वाट चुकल्यावरच पाखरांनी गाणे गावे पळसाच्या फुलांकडे पहा हळूच चोरून लपविल्या आशयाच्या खुणा तिथेच अजून : खुणा : उत्सव : मंगेश पाडगांवकर