थोडे तरी रक्त वाहो शुष्क हृदयीचे
देठ उजळण्या मंद बकुळफुलांचे
पाणियाची मुळी व्हावी निळी कमळंण
तैसा शब्द व्हावा तृषातृप्त द्रोण
दोन हातांतील पूजा येथेच राहून
दोन डोळ्यांच्या काठानें आले गेले जन्म
व्हावी हातांची परडी खुडू यावे डोळे
अश्रूस्नात मन व्हावे मोगरीचे कळे
काही नाही तेथोनिया गंध कळीस्तव
वाहतांना यावा जीवा पांघरू विस्तव
: पूजा
: दिवेलागण
: आरती प्रभू
देठ उजळण्या मंद बकुळफुलांचे
पाणियाची मुळी व्हावी निळी कमळंण
तैसा शब्द व्हावा तृषातृप्त द्रोण
दोन हातांतील पूजा येथेच राहून
दोन डोळ्यांच्या काठानें आले गेले जन्म
व्हावी हातांची परडी खुडू यावे डोळे
अश्रूस्नात मन व्हावे मोगरीचे कळे
काही नाही तेथोनिया गंध कळीस्तव
वाहतांना यावा जीवा पांघरू विस्तव
: पूजा
: दिवेलागण
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा