जांभुळपिक्या
आल्या ग रात्रीं
स्वप्नांना जुईची जाग
डोळ्यांच्या कडे
बांधून झुला
झुलते कुसुम्बी आग
डोळ्यांत सुर्मा
घालून झाडें
घेतात जलाचा थांग
सुरांसारखी
उमटे दूर
दिव्यांची हळवी रांग
झरा डोळेभोर
सावल्यांचा हा
पानांनी झाकतो सूर
नाही ग नाही
सोसवत हा
काजवा जवळ... दूर
जांभुळपिक्या
आल्या ग रात्रीं
थरारे कोवळे गीत
किती दिसांनी
पुन्हा ये भरा
बावऱ्या डोळ्यांची प्रीत
: किती दिसांनी
: उत्सव
: मंगेश पाडगांवकर
आल्या ग रात्रीं
स्वप्नांना जुईची जाग
डोळ्यांच्या कडे
बांधून झुला
झुलते कुसुम्बी आग
डोळ्यांत सुर्मा
घालून झाडें
घेतात जलाचा थांग
सुरांसारखी
उमटे दूर
दिव्यांची हळवी रांग
झरा डोळेभोर
सावल्यांचा हा
पानांनी झाकतो सूर
नाही ग नाही
सोसवत हा
काजवा जवळ... दूर
जांभुळपिक्या
आल्या ग रात्रीं
थरारे कोवळे गीत
किती दिसांनी
पुन्हा ये भरा
बावऱ्या डोळ्यांची प्रीत
: किती दिसांनी
: उत्सव
: मंगेश पाडगांवकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा