मौनाचा तो रंग । तुझे डोळेपण
काजळा ग देणं । लागे ज्योती
दिस विसाविता ।मनचि पांगले
मोगरीचे कळे । ठायीं ठायीं
साद न ये घालू । उरीच्याही लयी
नाद वाहों जाई । चहोकडे
पुष्पशेजेपरी । आगीचं अंथरू
मी - तू पण करूं । पांघरूण
होतील ग अंगें । राख एके ठायीं
तुझीमाझी येई । वेगळू का ?
ऐशा वसतीची । आम्ही एकजणे
पाठमोरें होणें । डोळापणी
: एकजणे
: दिवेलागण
: आरती प्रभू
काजळा ग देणं । लागे ज्योती
दिस विसाविता ।मनचि पांगले
मोगरीचे कळे । ठायीं ठायीं
साद न ये घालू । उरीच्याही लयी
नाद वाहों जाई । चहोकडे
पुष्पशेजेपरी । आगीचं अंथरू
मी - तू पण करूं । पांघरूण
होतील ग अंगें । राख एके ठायीं
तुझीमाझी येई । वेगळू का ?
ऐशा वसतीची । आम्ही एकजणे
पाठमोरें होणें । डोळापणी
: एकजणे
: दिवेलागण
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा