चांदण्यांचा झोत झरे नभातून
माझ्या मनातून ध्यास तुझा.
निर्झराचा नाद घुमे पहाडांत
माझ्या अन्तरात हाक तुला.
जुन्या देवालयात उजळते वात
माझ्या जिवनात प्रीति तुझी.
निळ्या आभाळात पाखरांचे थवे
वेडी माया धावे तुझ्याकडे.
निशी स्मशानांत रात्रींचर रडे
उरी धडधडे तुझ्यासाठी.
: ध्यास
: विशाखा
: कुसुमाग्रज
माझ्या मनातून ध्यास तुझा.
निर्झराचा नाद घुमे पहाडांत
माझ्या अन्तरात हाक तुला.
जुन्या देवालयात उजळते वात
माझ्या जिवनात प्रीति तुझी.
निळ्या आभाळात पाखरांचे थवे
वेडी माया धावे तुझ्याकडे.
निशी स्मशानांत रात्रींचर रडे
उरी धडधडे तुझ्यासाठी.
: ध्यास
: विशाखा
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा