विवाह व्हाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्थ? एक पक्ष अती मठ्ठ असावा दुजा असावा धूर्त. नीति म्हणजे तुम्ही मारावे आम्हीही मरावे सदय होऊनी दक्ष असू पण प्राण न अपुले जावे. गावापाशी पडली होती शत दगडांची रास म्हणे तलाठी मंत्र्यासाठी कोनशिला या खास. स्त्री म्हणजे का - कुणी गरजली - वाटे फक्त मिठाई? अहो, मिठाई आम्ही खातो ना ती आम्हा खाई ! दान भूमीचे दान धनाचे परिश्रमाचे दान कळे ना आता दात कुणाचे आणि कुणाची मान ! लयला मजनू कधी विवाहित झाले असते काय? असते तर ते लयला मजनू उरले असते काय? मदिरेवर का रोष एवढा मी पुसले नेत्याला उत्तर देण्याइतुकीं नव्हती शुद्ध राहिली त्याला. साधुत्वाचा (इतरांसाठी) या लोकांना ध्यास हंस लोपले , धवलपणा हो बगळ्यांची मिरास. दागदागिने चवदाचे ते बघुनी तापली पतिव्रता आणि गरजली- पातिव्रत्यही घ्या हे चवदाचेच आत्ता. कथती...
भुईवर आली सर सर श्रावणाची भुईतून आली सर रुजव वाळ्याची भुईवर आली खार खार धिटाईची , भुईतून कणसात चव मिठाईची. भुईवर आली उन्हें उन्हें पावसाची पायीं तुझ्यामाझ्या भुई चिकणमातीची ! : सर : नक्षत्रांचे देणे : आरती प्रभू