उद्या उद्या तुझ्यामध्येच
फाकणार न उद्या
तुझ्यामध्येच संपणार
ना कधीतरी निशा
उद्या तुझी धरून कास
आज कार्य आखले
तुझ्यावरी विसंबुनी
कितीक काम टाकले
उद्या तुझ्याचसाठी
आज
आजचे न पाहतो
तुझ्याचकडे लावुनी
सद्देव दृष्टी राहतो
उद्या तुझ्यासवे
निवांत
आजचा अशांत मी
उद्या तुझ्यामुळेच जिवंत
आजचा निराश मी
: अनिल
मराठी कविता इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो!! :)
उत्तर द्याहटवा