मुख्य सामग्रीवर वगळा

पाऊस



आषाढातील एखादी दुपार असावी. पाऊस घेऊन आलेले श्यामल मेघ मात्र सर्वत्र एकसंध पसरललेले. पण पाऊस नाहीये. थोड्या वेळापूर्वी एक सर येऊन गेलीय. भोवतीच्या झाडावरचे शहारे अजून मावळलेलेसुध्दा नाहीत, तोच दुपारी सर येऊ पाहतेय. ओलसर गंधमय वारा पानापानांतून चवचाल चालीने निघालाय, फांदीफांदीवर मुकाट बसलेले करड्या रंगाचे थवे आणि जवळच असलेल्या पाण्याच्या शांत डोहावरून फक्त एखाद्याच पाखराचे उडत गेलेले चुकार प्रतिबिंब.
हे सगळं वातावरणच येतं ते मुळी उरातल्या सार्या संवदेना चेतवीत. सृष्टीचा हा बदलू पाहणारा साज चोरट्या रसिकाच्या कुतूहलानं बघावा. आपलं असं वेगळेपण ठेवू नये. सृष्टीची ही नवलाई आणि आपण यात सीमारेषा ठेवल्या तर मग संपलंच की सारं. वारा होऊन वाहत यायला हवं आणि वाढलेल्या गवतातलं एकुलतं एक पिवळं फुलपाखरू होता होता नव्या उमलणार्या फुलाला स्पर्शता यायला हवं.

पाऊस ! निसर्गाचा एक उत्कृष्ट विभ्रम. ग्रीष्मानं व्याकुळलेल्या वसुंधरेचं आमंत्रण स्वीकारीत येणारे श्यामल मेघ काळजात घेऊन वावरण्याचं मन ज्याला आहे, त्याला मला काय म्हणायचंय ते समजू शकेल. ज्याला कुणाच्या तरी प्रेमात पडता येतं, ज्याला समरसून झोकून देता येतं आणि ज्याला स्वत:च्या व्यक्तित्वाचा विसर पाडून सृष्टिच्या या भुलभुलय्यात हरवता येतं, तो तर पाऊस जगतोच.
पाऊस जगता यायला हवा. पाऊस भोगता यायला हवा. पाऊस झेलून ज्यांची फक्त शरीरं भिजतात ते कधी पावसात भिजतच नाहीत. ज्यांना हे तुषार काळजापर्यंत जाणवतात, रक्तातले तरंग ज्यांच्या पापणीच्या काठाला येऊन भिडतात, तेच खरं तर पाऊस अनुभवतात. सर्व सृष्टीचा मोहोर, अनाघ्रात गंध मनाचा मोर झुलवत झुलवत झुलतोय आणि पर्युत्सुक स्पर्शाची सारी निमंत्रणं स्वीकारण्यासाठी समोर जिवलगाची ओंजळ डोळ्यांतून विशाल विशाल होतेय. एकमेकांच्या श्वासातून शब्दांचा स्पर्श होण्याआधीच भावनेला वाचा फुटतेय आणि स्वत:च्याही नकळत पुढं पडणारं पाऊल सर्वार्थानं अंतर कमी करत पडू लागलंय. सळसळणारा वारा, इंकारणारी शरीरं आणि भोवतीची ओलेती दुपार : जणू या एकांताचा एक पडदा अलगद गुंफला जातोय. संकोचाची सारी टरफलं गळून पडावीत, असं हे मदिर वातावरण.

आनंदाचे निमित्त - प्रविण दवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन्‌ नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन्‌ तूंच घे

शब्द

घासावा शब्द । तासावा शब्द  । तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी  ।। शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा । बेतावेत शब्द  । शास्त्राधारे ।। बोलावे नेमके ।  नेमके , खमंग खमके । ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।। बोलावे बरे । बोलावे खरे । कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।। कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग । जातपात धर्म । काढूच नये ।। थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे । मुद्देसूद बोलणे । हि संवाद  कला ।। शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती । स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।। शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल । शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।। जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता । पाणी , वाणी , नाणी । नासू  नये ।। : संत तुकाराम 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती   कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना गहिवर यावा जगास सा - या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर _ गुरु ठाकूर