आला कुठूनसा वारा
सर्वे सावळा आनंद ;
आनंदाच्या शिंपणात
पानडीचा ओला गंध
बाभळीचे हळदिवे
झोत गंधांचे झेलती
फांद्यांमधील
चंद्राला
रंग पिवळा माखती
असा माखलेला चंद्र
माझ्या खिडकीशी आला ;
डोळां चांदणे बघून
उटी विसरुनी गेला
: आला कुठूनसा वारा
: चित्कळा
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा