किती लुटावे डोळ्यांनी
दिवसांचे निळेपण ;
काच रंगेना मनाची ,
उमटेना निळी धून
;
किती खोल घ्यावे
श्वास
पिण्या काळोखाचे विष ;
रिते जरी लाख
डोह
नाही जहराचा होष ;
नाही बासरीची धून ,
नाही कशी विषबाधा
;
अशी कशी ही
पापीन ….
हसे मीरा , हसे राधा
.
: किती लुटावे डोळ्यांनी
: मृगजळ
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा