होईल तितुके
प्रेम मी करीन
जोवरी हा जन्म
… ओढतसे
पुरे झिजवीन
जरी न चंदन
सुगंधावाचोन
… जळे तरी
पुरे आत्ता सोंग
काय न ठावूक
फक्त तुझी भीक
… मागितली
मात्र माझा भार
न होवो तुजलागी
ना तरी अभागी
… दूर बरी
तेही न वाऊगे
ऐशी मी दुभंग
तुझाच अभंग … जोपासीन
: होईल तितुके
: शिरीष पै
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा