कापऱ्या हातांनी लिहिले तोतरे
मुके शब्द शब्द
बधिर बहिरे ;
थोडेसे गगन कडू
आणि काळे
अर्धेच औषध घशात
राहिले
सनईचे सूर तीक्ष्ण
पर्णोपर्णी
विळखा घालून डंख देती
मनी
उलट्या पायांनी पिशाच्च चालते
ठिगळे जोडीत आसवे ढाळीतें
मरणाचा अर्थ तोकडा
मिळतो
कातरवेळेला
घर लुबाडतो
: कापऱ्या हातांनी
: जोगवा
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा