तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी
तरी सत्यभामे ढळे तोल का ?
झाडाप्रमाणे असे झाड हेही
असे सांगते ती ,तरी हुंदका ?
तरी सत्यभामे ढळे तोल का ?
झाडाप्रमाणे असे झाड हेही
असे सांगते ती ,तरी हुंदका ?
इथे बासरीच्या गडे आतड्याला
हवा चंदनी लाकडाची नवी;
तुला रुक्मिणी का फुले वेचताना
सुगंधातही भेटते वाळवी ?
हवा चंदनी लाकडाची नवी;
तुला रुक्मिणी का फुले वेचताना
सुगंधातही भेटते वाळवी ?
संहार आता करा यादवांचा
जुनी राजधानी निनावी करा ;
रथाला कुणी अश्व देऊ नका अन
शिरच्छेद माझे कसेही करा .
जुनी राजधानी निनावी करा ;
रथाला कुणी अश्व देऊ नका अन
शिरच्छेद माझे कसेही करा .
तिथे कृष्णएकांत देठात प्राजक्त
राधेस हा रंग येतो कसा ?
सर्वेश्वराला कधी या मुलीने
न मागीतला रे तिचा आरसा….
.
वैराण आयुष्य झाले तरीही
फुलांना कुणी बोल देऊ नये;
मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या
गवाक्षातला चंद्र झाकू नये.
राधेस हा रंग येतो कसा ?
सर्वेश्वराला कधी या मुलीने
न मागीतला रे तिचा आरसा….
.
वैराण आयुष्य झाले तरीही
फुलांना कुणी बोल देऊ नये;
मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या
गवाक्षातला चंद्र झाकू नये.
नको धाक घालू नको हाक तोलू
इलाख्यातली गुप्त झाली नदी ;
निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो
खुनाच्या कटातूनहि गारदी…
इलाख्यातली गुप्त झाली नदी ;
निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो
खुनाच्या कटातूनहि गारदी…
: सांध्यपर्वातील वैष्णवी
: ग्रेस
खूपच सुंदर कविता आहे. समायिक केल्याबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवा