निळेसावळे आभाळ
भरून ओथंबून
तसे माझे शब्द
…. घनगर्द
ओठांवर येता येता
पांढरे भक्क झाले
,
हलक्या हलक्या कवड्या झाले
,
खुळखुळ वाजायला लागले ,
पांढरेशुभ्र
बगळे होऊन ओठांवरून
उडून गेले ….
तेव्हा
मीच मनाचे ओठ घट्ट
मिटून टाकले क्षितीजासारखे
.
: निळेसावळे
: चित्कळा
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा