कुणी पूजिते कुणाला
चित्तगंधीच्या
फुलांनी ,
धुंद विजेच्या परागं
गंध आगळा उन्मनी
.
कुणी उतरते पूजा
तपी चाफ्याच्या मुळाशी
दिसामाशी वाढणाऱ्या
निर्माल्याच्या
राशी राशी ….
राशीतील चंद्र्धारा
काय शोषिल्या मुळांनी ?
चाफा उतत मातत
उधळला रोमरोमी
पाने धावली दिशांशी ,
तुरे पोचले आकाशी
आणि भिडला दर्वळ
अंतराच्या उराशी
इथे चाफ्याच्या तळाशी
ऊनसावलीची जाळी ,
पावलांची प्रदक्षिणा
संथ उमटू लागली
.
: प्रदक्षिणा
: चित्कळा
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा