कुठे फुलला मोगरा…
इथे दरवळ पोचला
:
येणारा तो येत
आहे
खुण मिळाली मनाला .
डाव्या पापणी नको गं
अशी वाजवू नौबत ,
अरे अधूऱ्या हृदया
नको धावू धडाडत
.
मनकर्णिके नको गं
अशी उगा उतावळी
:
तो न माझा
सखा स्वामी ,
मी न त्याची
चाफेकळी
उन्हे भेटती आकाशा ,
वारा भेटे अवकाशा
:
तशीच हि आहे
भेट ,
व्हा न बाजूला
कशा .
: येणारा तो
: बाहुल्या
: इंदिरा संत
Thanks a lot!!!
उत्तर द्याहटवाI saw this poem sung by Ravindra Sathe long long back on Doordarshan. I was very young then, but I have been trying to find the audio of it but never found it. Do you know where can I find it?