असेच फसले होते
हेतू
तुझ्याभोवती
भोवळतांना ,
असेच फसले होते
डोळे
तुलाच सगळी साठवताना
फसली नाही तुझी
पापणी
ढाळीत असतां तमी चांदणी
फसले नाही अधर
जराही
घालीत असतां फुंकर मौनी
गाठित होतीस क्षितीज मुक्याने
मुकेच होतें क्षितीज परंतु
तुझ्याभोवती
भोवळताना
म्हणून फसले होते
हेतू
: तुझ्याभोवती
: जोगवा
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा