हाकेवरी आहे गाव
याच आशेने चालले
गेले दिवस महिने
:
वाटे युगच संपले
दूर दूर तेवणारा
दिवा कसा तो
दिसेना
डोंगराच्या
पायथ्याशी
रेघ धुराची वोळेना
ऐकू यॆइना पावरी
आणि घुंगुरांचा नाद
राऊळीच्या घंटेचाही
उमटेना पडसाद
कुठे असेल ते
गाव
जिथे आहे पोचायाचे
कुठे असेल ते
घर
जिथे आहे थांबायाचे
?
कुठे असेल तो
स्वामी
त्याही वास्तूचा महान
ज्याच्या पायापाशी आहे
टाकावयाचे आहे तनमन
: हाकेवरी आहे गाव
: बाहुल्या
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा