रानात रानात
जांभूळबनात
झडली श्रावणगाणी
गंधल्या मातीत
पुनव उजट
अंकुरे लाख वितांनी
नागड्या झाडांना
लखडे पालवी
स्वप्निल , हाऊन धुंद
पांगल्या नभात
दाटली दर्वळ
ओठात रुतले छंद
सांजल्या मनात
जाणीव जागली
लेऊन मोत्याचा तुरा
क्षितीजवाटेत
सांडल्या चांदण्या
होऊन सोनफुलोरा !
: रानात रानात जांभूळबनात
: रानातल्या कविता
: ना. धों. महानोर
जांभूळबनात
झडली श्रावणगाणी
गंधल्या मातीत
पुनव उजट
अंकुरे लाख वितांनी
नागड्या झाडांना
लखडे पालवी
स्वप्निल , हाऊन धुंद
पांगल्या नभात
दाटली दर्वळ
ओठात रुतले छंद
सांजल्या मनात
जाणीव जागली
लेऊन मोत्याचा तुरा
क्षितीजवाटेत
सांडल्या चांदण्या
होऊन सोनफुलोरा !
: रानात रानात जांभूळबनात
: रानातल्या कविता
: ना. धों. महानोर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा