रान ओले
चिंब ओले
तुझ्या कातीव लेण्याला
वस्त्र लाघट लाखले
नभ ओले
चिंब ओले
ऊनसाउलीचे जाळे
तुझ्या डोळ्यांत गुंतले
रान ओले
पीक झुले
तुझ्या अंधारबनात
वारे झिंगून गेलेले
रान ओले
चिंब ओले ....
: रान ओले चिंब ओले
: रानातल्या कविता
: ना. धों . महानोर
चिंब ओले
तुझ्या कातीव लेण्याला
वस्त्र लाघट लाखले
नभ ओले
चिंब ओले
ऊनसाउलीचे जाळे
तुझ्या डोळ्यांत गुंतले
रान ओले
पीक झुले
तुझ्या अंधारबनात
वारे झिंगून गेलेले
रान ओले
चिंब ओले ....
: रान ओले चिंब ओले
: रानातल्या कविता
: ना. धों . महानोर
👌
उत्तर द्याहटवा