ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या
आणिते
अन् जाताना फुले
मागते.
येणेजाणे, देणेघेणे
असते गाणे जे न कधी
ती म्हणते.
येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते
कळते काही उगीच तेही,
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन उगीच
'नाही', 'नाही' म्हणते.
येतानाची कसली रीत
गुणगुणते ती संध्यागीत
जाताना कधि फिरून
येत,
जाण्यासाठिच दुरुन
येत,
विचित्र येते, विरून
जाते जी सलते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा