शुभ्र मिजास जुईची
उसवली तरी,
आणि आरास भुईची
ओसरली तरी,
आज आली न
अजून
आंब्यावर खार :
आला आहे पिकुनिया
तुटू फळभार …
आतां निळीत चांदणी
फुटू आली तरी
,
आणि ओठांत जांभई
दाटू आली तरी
,
आज आल्या नाही कशा
चिमण्या बारीत ?
डाळींबाचे दाणे लाल
बावले बशीत …
: आणि ओठांत जांभई
: जोगवा
: आरती प्रभू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा