पाउस
भिजले रान .
झाडे झाली मुकी
,
फुलांतून
गळे हिमान .
पिकात केशरगंध
सबंध
हिसळते काय.
दाट ढगांच्या छाया
झिम्मा
खेळून जाय .
घाट . निसरडी वाट
नदीचा
झुलता काठ
मिठीत बिलगून चिंब
निथळती
सोनपहाट
ओलेचिंब सबंध नसांतून
पेटून रान ,
रातझडीचा पाउस पाउस
भिजले रान .
: रानातल्या
कविता
: ना. धों . महानोर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा