तुझ्यासाठी
कितीदा
तुझ्यासाठी रे !
मी दुहेरी
बांधल्या
खूणगाठी
–खूणगाठी रे !
मी दुपारी
सोसले
ऊन माथी
— ऊन माथी रे !
लाविल्या मी
मंदिरी
सांजवाती
–सांजवाती रे !
कैक आल्या,
संपल्या
चांदराती
–चांदराती रे !
मी जगाच्या
सोडल्या
रीतभाती
— रीतभाती रे !
: ना घ देशपांडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा