-१-
इवला
झाला गायन गात;
चांदण्यांसवे
हासली रात;
हालेना
जरा वेलींचे पान;
निजली
धरा; निजले रान,
आई,
बहिणी झोपल्या घरी;
ये
गऽ ये गऽ ये मागल्या दारी!
माथ्यावरती
आला चंदीर
सांग,
मी कसा धरावा धीर ?
भागले
डोळे वाट पाहून :
प्रीतीची
माझी ये गऽ मालन !
-२-
पुष्पवारती
दवाचे बिंदू;
अंतराळात
सुंदर इंदू;
पानोपानी
की नाजूक वारा;
झीमझीम
की झडीच्या धारा;
तशीच
येते मूक, मोहन
अंगणातल्या
वेलीमधून
शारदाची
की ढवळी रात;
हासली
प्रीत आतल्या आत !
दाविते
कोण हंसीची मान ?
हासून
येते माझी मालन !
-३-
पाहून
तुझे काजळी डोळे
माझे
गंऽ मन भुलले भोळे !
कपाळावरी
चांदणी कोर;
मुक्त
सोडला केसांचा भार;
हासणे
गोड लावण्यखाणी;
कंठामधून
कोकळगाणी
;
फुलांचे
हार शोभले गळा;
रानराणीचा
शृंगार भोळा.
कोणाचे
ध्यान, कोणाचे गान,
प्रीतीचे
कोण, सांग, मालन ?
-४-
एकाएकी
का थांबली अशी ?
संध्येची
दूर चांदणी जशी !
मूर्तच
जशी हाले चाले ना !
उभी
का दूर अधोवदना ?
कंपन
ओठी, लाज नयनी :
बावरू
नको रानहरिणी
!
काय
मनात भीती सारखी ;
नको
गंऽ परी – होऊ पारखी !
प्रीतीला
नाही भीतीचे भान ;
प्रीतीची
माझी देवी मालन.
-५-
एकमेकांच्या
आलिंगनात
;
भावनामय
चुंबनगीत
;
एकमेकांच्या
नयनांवरी
प्रीत
मोहक, मूक, नाचरी;
एकमेकांचा
हृदयनाद
घालत
आहे एकच साद.
इवला
झरा गायन गात;
चांदण्यांसवे
हासली रात;
हासले
जरा वेलीचे पान;
हासली
धरा; हासले रान !
: ना घ देशपांडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा