डोळे कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी ...
आला भरून पाऊस ,
नको एकटा जाऊस.
सरी कशासाठी ?
तुला बिलगुन भिजून जाण्यासाठी.....
नाव तुझे मनातले
चांदणेच रानातले,
शब्द कशासाठी ?
तुला आठवून भरून येण्यासाठी.....
वेल मोहरून आली ,
फुले अंगभर झाली .
वारा कशासाठी ?
गंध वनातून पाखरू होण्यासाठी.....
असा तुझा भरवसा
चांदण्याचा कवडसा.
ओठ कशासाठी ?
उरी थरारून जुळून गाण्यासाठी.....
: मंगेश पाडगावकर
: भटके पक्षी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा