उडणाऱ्या पाखराला नाव नसते,
त्याला असतात फक्त दिशा;
जाईल तिथे नजरेची फांदी असते,
माझेपणात जखडलेले झाड नसते.
तरीही आपल्या खिडकीच्या चौकटीतून
दिसणारे आभाळ केवळ आपलेच असते
आणि आपल्या आभाळातून उडणाऱ्या पक्ष्याला
अगदी आपले असे नाव असते :
जे तुझे एक नाव माझ्या ओठांवर
केवळ माझ्या मनात हाक घालण्यासाठी .
: भटके पक्षी
: मंगेश पाडगावकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा