क्षितीजावरी थांबेन मी तू हाक मजला दे जरा
वाऱ्यातुनी लाटांतुनी तू हाक मजला दे जरा
सांजवेळी अंगणी होतील व्याकुळ सावल्या
सूर तू होऊन तेव्हा माळव्यातून ये जरा
दाही दिशांतून गर्जुनी येतील जेव्हा वेदना
होऊन तू हुंदका माझ्या उरातून ये जरा
वादळे नेतील मजला दूर जेव्हा वाहुनी
तू किनारा होऊनी मजला दिलासा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा