नाव तुझे तर
लहान साधे
रंगित इवल्या रानफ़ुलापरि ;
विरघळताना सुरांत अस्फुट
रंग सांडती तनुमनावरि
नाव तुझे ते
अगदी साधे
सोनुकले तरी फुल
विजेचे ;
ओठांवरुनी हळू फिरविता
भान घालवी भवतालचे
नाव तुझे ते
… तुझेच अगदी …
तुलाच ते ; पण
नव्हेस तूच .
: नाव तुझे तर
: मेंदी
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा