आज उन्मळून पडलो वादळात मी...
तुझ्या अंगणी होतो पारिजात मी...
तुझे येणे येता येता राहून गेले ,
होतो त्या वळणावर वाट पहात मी...
पालवीच्या
स्वप्नांवरती जगलो तरीही ,
झडतच गेलो प्रत्येक वसंतात मी...
काट्यांनी
निदान नाती जपली असती ,
उगाच गुंतलो होतो पाकळ्यात मी...
निखा-याची धग आता जाणवत नाही ,
इतके दिवस होतोच की वणव्यात मी...
सावली आहे मी तुझी, म्हणाली होतीस ;
म्हणून आयुष्यभर राहिलो उन्हात मी...
: अभिजीत दाते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा