एक हवे मज
, एक हवे मज
,
दुःख हवे मज
असेच काही ,
जखम जयाची सदाच ताजी
तीव्र वेदना घुमवित राही
नको तशी ती
कधी भराया;
नको बधिरता त्या जखमेवर
;
नकोत टाके तिला
जुळाया ;
नको तिच्यावर शीतल फुंकर
असा असावा दाह तिचा
पण :
निळी तांबडी एकच ज्वाला
;
बेभानपणी अंधारातून
तुझ्याकडे ती आणिल
मजला
: एक हवे मज
: मेंदी
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा