पाऊस ढगातून येतो ?
मी ढगात जाईन.
नभातून येतात ढग ?
नभात राहीन मी.
नभ थेटच येतात
अंतराळातून ?
अंतराळ पाहीन मी.
गाण्यातून शब्द येतात
? शब्दांचा होईन मी
.
शब्दांना अर्थ असतो
? अर्थ वाहीन मी .
तळपायांना आग लावून
मेंदूवर रचून
ठेवीन मी, बर्फाची
सगळी अरण्ये.....
गाणे ऐकू आले
तर मीही होईन
बिनचेहर्याची
एक
पहाडी स्त्री !!!
: ग्रेस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा