एकमेकांना खोलवर दुखावतो आपण
उसळून येतो नव्याच
प्रमाथी नाजूकपणे
परस्परांवर
प्रलयातून कोसळून पडतो
जणू प्रेम करणाऱ्यावरचा एकमेव
अटळ इलाज
म्हणून अधिक प्रेम
करणे
अश्या झोंबऱ्या श्रद्धेवरच
हेलपाटणारा
अवघा जन्म तोलून
धरतो
: अरुणा ढेरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा