मध्यरात्रीच्या गाढ तमी तू घेतले हृदयी मला
स्मरशील का मज भय वाटे , दिन येता उदयाचला !
तव कवेत माझी गुदमरली तनुलता
उद्दाम चुंबने अधरावर बरसता
हृदयाशी होता हृदयाची एकता
नक्षत्रापरी उजळत जाळीत गेले गगनांगणी
पंख द्युंतीचे तोडशील का , हीच मना जाचणी !
मम नाव चालता क्षुब्ध सागरावरी
प्रगटली दिव्यांची रांग निळ्या बंदरी
ती अज्ञातांतील दिसली अलकापुरी
रत्नखचित वेशिंतूनी नेसी मला किनाऱ्यावरी
जीवनभर हे अपार वैभव अथवा घटकाभरी !
: भीती
: मराठी माती
: कुसुमाग्रज
स्मरशील का मज भय वाटे , दिन येता उदयाचला !
तव कवेत माझी गुदमरली तनुलता
उद्दाम चुंबने अधरावर बरसता
हृदयाशी होता हृदयाची एकता
नक्षत्रापरी उजळत जाळीत गेले गगनांगणी
पंख द्युंतीचे तोडशील का , हीच मना जाचणी !
मम नाव चालता क्षुब्ध सागरावरी
प्रगटली दिव्यांची रांग निळ्या बंदरी
ती अज्ञातांतील दिसली अलकापुरी
रत्नखचित वेशिंतूनी नेसी मला किनाऱ्यावरी
जीवनभर हे अपार वैभव अथवा घटकाभरी !
: भीती
: मराठी माती
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा